कोकण

महिलांनी श्रमदानातून बांधले नदीवर बंधारे...

CD

rat२६p७.jpg-
P२५O१३५६०
रत्नागिरी-तालुक्यातील चांदोर उगवतीवाडी येथे महिलांनी श्रमदानातून नदीवर बांधलेला बंधारा.
-----
महिलांनी श्रमदानातून बांधले बंधारे
चांदोर उगवतीवाडीसह चिंचवाडीतील बचतगटाचा आदर्श
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ : तालुक्यातील चांदोर ग्रामपंचायत हद्दीत महिला बचतगटाने नवा आदर्श लोकांपुढे ठेवला आहे. श्रमदानातून अतिशय नियोजनबद्ध नदीवर वनराई बंधारे बांधले आहेत. अतिशय कमी खर्चात बांधण्यात आलेल्या या बंधाऱ्यांमुळे पाणी आडवल्यामुळे त्याचे अनेक फायदे स्थानिकांना मिळणार आहेत.
ग्रामपंचायतीचे उपसरपंच सूर्यकांत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानांतर्गत लोकसहभाग आणि श्रमदानातून हे बंधारे बांधण्यात आले आहेत. चांदोर उगवतीवाडी व चिंचवाडी येथील महिला बचत गटातील महिलांनी तसेच तालुक्यातील चांदोर ग्रामपंचायत हद्दीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम झाले. अभियान अंतर्गत लोकसहभागातून चांदोर उगवतीवाडी व चिंचवाडी येथील महिला बचतगटातील महिलांनी तसेच नेहा तांबे यांच्या नियोजनातून वनराई बंधारे बांधण्यात आले.
बंधारा बांधण्यासाठी दगडमाती, रिकाम्या सिमेंटच्या पिशव्या यांचा वापर करून अतिशय कमी खर्च करून हा बंधारा बांधण्यात आला. वनराई बंधारा परिसरात भूजल पातळी वाढण्यास मदत होईल शिवाय विहिरीच्या पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. यामुळे पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी मदत होईल तसेच आजूबाजूच्या जमिनीत ओलावा टिकून राहील. या बंधाऱ्यांमुळे पाणीटंचाईला आळा बसेल व महिलांचा, जनावरांचा पाण्याचा प्रश्नही सुटेल. हे बंधारे बांधण्यासाठी बचतगटातील महिलांना ग्रामस्थांचेही सहकार्य मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cooperative Strike : महाराष्ट्रात गटसचिवांचे असहकार आंदोलन, संगणकीय कामकाजावर बहिष्कार

T20 World Cup IND vs NAM :६,६,६,६,४! इशान किशनचे २० चेंडूंत अर्धशतक, संजू सॅसमननेही ३०० च्या स्ट्राईक रेटने चोपल्या धावा...

Latest Marathi News Live Update: स्थायी समिती कोणाकडे? आज होणार यादी जाहीर

Ambegaon News : शिरदाळे येथील गावच्या तळ्यात मासे पकडताना साहेबराव केदारी यांचा पाण्यात बुडून मृत्यू

Horoscope : उद्याचा दिवस 'या' ४ राशीच्या लोकांसाठी लकी; अचानक मिळतील पैसे, प्रेम आणि नातेसंबंधात मोठा बदल, नोकरी-व्यवसायात यश

SCROLL FOR NEXT