कोकण

राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमातून चिमुकल्याला नवे आयुष्य

CD

13537
कुडाळ ः राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत बालकाची तपासणी करणारी पथके कार्यरत आहेत.


राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमातून चिमुकल्याला नवे आयुष्य

आरोग्य विभागाची तत्परता; मुंबईत यशस्वी शस्त्रक्रिया, नेरुरच्या कुटुंबाला दिलासा

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २७ ः तालुक्यात राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत दोन पथके कार्यरत आहेत. मागील वर्षी २०२४-२५ मध्ये या पथकांकडून शालेय मुलांच्या ९५ इतर प्रवर्गातील शस्त्रक्रिया तसेच हृदयरोगाच्या ७ शस्त्रक्रिया यशस्वी केल्या. यासाठी येथील महिला बाल रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयाचा मोलाचा वाटा आहे. एवढ्या मुलांना सेवा दिल्याबद्दल समाजातून कौतुक होत आहे. दरम्यान, इजहान शेख या चिमुकल्याची हृदयरोग शस्त्रक्रिया यशस्वी झाली, अशी माहिती महिला बाल रुग्णालयाचे डॉ. संजय वाळके यांनी दिली. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अंगणवाडीतील मुले त्याचप्रमाणे शाळेतील मुलांची दरवर्षी आरोग्य तपासणी केली जाते. यामध्ये ० ते १८ वर्षे वयोगटाचा अंतर्भाव असतो. या तपासणीमधून दुर्धर आजाराच्या मुलांना वेगळे केले जाते व त्यांच्यावरील उपचार तसेच शस्त्रक्रिया यांची योजना जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग तसेच ग्रामीण रुग्णालय कुडाळ यांच्यामार्फत पुरवण्यात येते. अतिगंभीर रुग्णांसाठी शासकीय स्तरावरून नेमून दिलेल्या अत्याधुनिक खासगी रुग्णालयांमध्येही या सेवा पुरवण्यात येतात. आजपर्यंत हजारो बालकांना या कार्यक्रमानुसार आरोग्य प्राप्त झाले आहे. कुडाळ ग्रामीण रुग्णालयांतर्गत येणाऱ्या मुलाची ही अशीच एक सुखद कहाणी अंतर्मुख करणारी अशी आहे.
नेरुर दुर्गवाड येथील आरिफ याकूब शेख यांचे कुटुंब मोलमजुरीवर उदरनिर्वाह करते. त्यांचा मुलगा इजहान याला जन्मताच हृदयरोग होता. या शस्त्रक्रियेसाठी खूप खर्च येतो. अशा स्थितीत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची टीम या बालकाला सहाय्य करण्यासाठी पोचली. त्यांनी हतबल झालेल्या पालकांना धीर दिला. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे डॉ. अमोल दुधगावकर, डॉ. मीनाक्षी सावंत, प्राप्ती तेली यांनी त्यांची सर्व कागदपत्रे गोळा केली, कोकिळाबेन हॉस्पिटल मुंबई येथील तज्ज्ञ डॉ. प्रशांत बोभाटे यांच्याशी समन्वय साधून मुलाच्या प्रकृतीविषयी माहिती दिली. अखेर ३ नोव्हेंबरला या मुलावर डॉ. बोभाटे यांनी कोकिळाबेन रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया केली. मुलाला नवसंजीवनी मिळाल्याने पालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे पर्यवेक्षक राजेश पारधी यांनी मोलाचे योगदान दिले. इजहानच्या आई-वडिलांनी शासनाचे आभार मानले.
--
...तर ‘बाल स्वास्थ्य’शी संपर्क साधा!
नेरुर दुर्गवाड येथील घटनेपासून सर्वांनी बोध घ्यावा. आपल्या आजूबाजूला किंवा कुटुंबातील मुलांना कोणताही दुर्धर आजार असल्यास राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची मदत अवश्य घ्यावी. यामुळे एका चिमुकल्याचे प्राण वाचतील, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील व कुडाळ ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. वाळके यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचा जुना फोटो काँग्रेस नेत्याने केला व्हायरल; शपथविधी सोहळा अन् जमिनीवर बसलेले मोदी

PMC Election : पुणे महापालिका निवडणुकीसाठी एकच उमेदवार ३ पक्षांकडून करत आहे अर्ज!

Latest Marathi News Live Update: बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर बांगलादेशातील हिंदूंच्या हत्यांविरोधात निदर्शने

Team India U19: आयसीसी U-19 वर्ल्डकप आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; कर्णधारपदाची धुरा कुणाकडे?

Pune Political Breaking : बराटे, शिवरकर यांची भाजप मध्ये एन्ट्री; वानवडीमध्ये राजकीय ट्विस्ट!

SCROLL FOR NEXT