कोकण

दीपक शेणई ‘दशावतारा’तील मार्गदर्शक

CD

13773

दीपक शेणई ‘दशावतारा’तील मार्गदर्शक

रुपेश पावसकर ः वालावल येथे रिक्षा व्यावसायिकांतर्फे सत्कार

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २६ ः कोकणाच्या दशावतार लोककलामध्ये दत्तप्रसाद शेणई हे केवळ एक नाव नाही, तर दशावताराच्या रंगमंचावर अविरत उजळत राहिलेला एक मार्गदर्शक दीप आहे. अभिनयातील सहजता, वाक्चातुर्य, पदन्यासातील लयबद्ध सौंदर्य आणि संगीताची आत्मस्पर्शी अनुभूती या साऱ्या गुणांनी नटलेले व्यक्तिमत्त्व आहे, असे प्रतिपादन युवा उद्योजक रुपेश पावसकर यांनी वालावल येथे केले.
वालावल तीर्थक्षेत्र दक्षिण काशी प्रति पंढरपूर श्री लक्ष्मीनारायण वालावल बसस्थानकात सद्गुरू श्री साईनाथ महाराज प्रतिमा पूजन व सत्यनारायण महापूजा कार्यक्रमात दशावतार क्षेत्रातील अष्टपैलू कलावंत दत्तप्रसाद शेणई यांचा सत्कार श्री. पावसकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
पावसकर म्हणाले, ‘लोककला केवळ सादरीकरण न राहता ती साधना कशी होते, याची प्रचीती येते. पुराणांचे गाढे अभ्यासक म्हणून शेणई यांची ख्याती आहे. कलाकार हा केंद्रस्थानी असावा, त्याचे कष्ट ओळखले जावेत, त्याला सन्मानाने जगता यावे, हा विचार त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येतो. दत्तमाऊली पारंपरिक लोककला दशावतार शिक्षण-प्रशिक्षण मंडळाचे खंदे शिलेदार म्हणून ते केवळ मंडळ सांभाळत नाहीत, तर पुढील पिढ्यांच्या हातात लोककलेचा वसा सुरक्षितपणे सोपवण्याचे अमोघ कार्य करत आहेत.’ वालावल साईभक्त रिक्षा व्यावसायिक व विविध व्यापारी मित्रमंडळ, बाजारपेठ वालावल यांच्यावतीने हा सत्कार करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ता मंडळाचे प्रमुख पदाधिकारी चंदू वालावलकर, महेश गोरुले, तुकाराम बंगे, विनोद आंबेकर, दीपक वालावलकर, उत्तम नांदोसकर, प्रसाद केळुसकर, दादू जबडे आदी उपस्थित होते.

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचा जुना फोटो काँग्रेस नेत्याने केला व्हायरल; शपथविधी सोहळा अन् जमिनीवर बसलेले मोदी

PMC Election : पुणे महापालिका निवडणुकीसाठी एकच उमेदवार ३ पक्षांकडून करत आहे अर्ज!

Latest Marathi News Live Update: बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर बांगलादेशातील हिंदूंच्या हत्यांविरोधात निदर्शने

Team India U19: आयसीसी U-19 वर्ल्डकप आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; कर्णधारपदाची धुरा कुणाकडे?

Pune Political Breaking : बराटे, शिवरकर यांची भाजप मध्ये एन्ट्री; वानवडीमध्ये राजकीय ट्विस्ट!

SCROLL FOR NEXT