तुळशी स्कूलमध्ये
सामाजिक, आरोग्य उपक्रम
मंडणगड ः तालुक्यातील तुळशी न्यू इंग्लिश स्कूल येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक व आरोग्यविषयक विविध उपक्रम यशस्वीरीत्या राबवण्यात आले. सामाजिक संस्था गुंज यांच्यामार्फत विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक साहित्य कीटचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच विद्यालयाला शैक्षणिक साहित्य म्हणून टॅब प्रदान करण्यात आला. हे सर्व साहित्य गुंज संस्थेचे प्रतिनिधी विजय दुर्गवले यांच्या हस्ते मोफत देण्यात आले. या वेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रद्धा नटे, सहाय्यक शिक्षक शिवाजी सोनवणे, खंदारे, सुरेश कोतवाल, लिपिक कैलास धाडवे तसेच शिपाई संदेश पारधी उपस्थित होते. विद्यालयात एचपीव्ही लसीकरण कार्यक्रम झाला. याच अनुषंगाने आरोग्य उपकेंद्रामार्फत खास मुलींच्या आरोग्याच्यादृष्टीने मासिक पाळी समुपदेशन कार्यक्रम झाला. त्यामध्ये आरोग्यसेविका पद्मावती आडे यांनी मार्गदर्शन केले.
-Rat२६p१३.jpg-
२५O१३५४८
मंडणगड : गुणवंत, यशवंत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक सत्कार करताना संस्थेचे उपाध्यक्ष रमेश दळवी, सरचिटणीस ॲड. विनोद दळवी.
डॉ. आंबेडकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा गौरव
मंडणगड ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात झाले. या प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. गंमतजंमत कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष रमेश दळवी यांच्या हस्ते, आनंद बाजार कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे सरचिटणीस ॲड. विनोद दळवी यांनी केले. या वेळी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. दहावी परीक्षेतील गुणवंत सिद्धी कासारे, रुद्राक्ष निंगदाळे, जान्हवी शेडगे, बारावीतील वैदवी पवार, अनुजा गरड, अक्षता पवार, ऋतिक घाग, ऋतिक खर्सेकर, सुविधा लोखंडे, पियुष नगरकर, सृष्टी गोसावी, अक्षा यादव यांना बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. चतुरंग प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी गोडबोले पुरस्कार कैवल्य जोशी याने पटकावला तसेच रत्नागिरी जिल्हा क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून कोल्हापूर विभागस्तरीय स्पर्धेत सहभाग घेतलेल्या प्रीती खळे, जागृती सापटे, सक्षम लोखंडे, श्रेयस कडव, रिया जाधव, साक्षी झोरे, वेदांत दुर्गवले या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचेही अभिनंदन करण्यात आले.
-rat२६p१४.jpg-
२५O१३५४९
दहागाव : आर्या तांबुटकर हिचे अभिनंदन करताना प्रशालेतील शिक्षक.
आर्या तांबुटकर मंडणगड तालुक्यात प्रथम
मंडणगड ः तालुक्यातील दहागाव येथील लालबहादूर शास्त्री हायस्कूल येथील सहावीतील आर्या तांबुटकर हिने रत्नागिरी जिल्हा माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्यावतीने आयोजित सानेगुरुजी कथाकथन स्पर्धेत मंडणगड तालुक्यातून लहान गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मंडणगड तालुका मुख्याध्यापक संघाच्यावतीने तालुकास्तरीय स्पर्धेचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलमध्ये झाले. स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळांमधील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये आर्याने सादर केलेली सगुणा ही कथा प्रथम क्रमांकाची विजेती ठरली. ही कथा प्रशालेतील शिक्षक किशोर कासारे यांनी लिहिली. कार्यक्रमाला तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष घाणेकर, सचिव रामचंद्र कापसे, विठ्ठल केंद्रे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.