कोकण

आचरा बागेश्री ओढ्यावर कच्चे बंधारे

CD

13582.
आचरा बागेश्री ओढ्यावर कच्चे बंधारे
आचरा ः आचरा ग्रामपंचायतीतर्फे आचरा बंदर मार्गावरील बागेश्री ओढ्यावर श्रमदानातून कच्चे बंधारे बांधण्यात आले. यावेळी सरपंच जेरोन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, ग्रामपंचायत अधिकारी पद्माकर कासले, ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर मुजावर, चंदू कदम, महेंद्र घाडी, पंकज आचरेकर, बबलू गावकर, ग्रामपंचायत कर्मचारी नरेंद्र परब यांसह इतर कर्मचारी, पोलिसपाटील विठ्ठल धुरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. या उपक्रमामुळे या परिसरातील पाणी पातळी वाढण्यास फायदा होणार आहे.
...................
13583
सुरेश ठाकूर यांना ‘बालसेवा पुरस्कार’
आचरा ः येथील सानेगुरुजी कथामालेचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश ठाकूर यांना अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचा मानाचा केंद्रीय ‘बालसेवा पुरस्कार’ जाहीर झाला आहे. रोख दहा हजार, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे वितरण बेळगाव येथे ११ जानेवारीला कथामालेच्या राष्ट्रीय अधिवेशनात होणार आहे. या पुरस्काराबद्दल कथामालेचे कार्याध्यक्ष लालासाहेब पाटील यांनी ठाकूर यांचे अभिनंदन केले आहे. श्री. ठाकूर हे गेले अर्धशतकाहून जास्त काळ बालसेवेचे कार्य करीत आहेत. मालवण कथामालेच्या माध्यमातून विविध स्पर्धांचे यशस्वी आयोजन करीत आहेत. ‘आनंद बालनाट्य मंडळ’ ही संस्था स्थापन करून अनेक बाल एकांकिका सादर करून राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त केले आहेत. हा पुरस्कार मधू वालावलकर, ज्ञानेश देऊलकर, श्रीपाद तोंडवळकर, प्र. के. वालावलकर, श्रीपाद पराडकर आणि चिंतामणी विश्राम धुरी यांना समर्पित करतो, असे श्री. ठाकूर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महत्त्वाची बातमी! मुंबईतील 'या' मोठ्या उड्डाणपुलावर वाहनांना ३ महिने नो एन्ट्री; पण कोणत्या अन् पर्यायी मार्ग काय? जाणून घ्या...

Teaching Jobs: मोठी बातमी! महाराष्ट्रात ५,५०० प्राध्यापक पदांसाठी भरती जाहीर; लवकरच सुरू होणार अर्ज प्रक्रिया

PMO Shift to Seva Teerth : प्रशासनात ऐतिहासिक बदल ! पंतप्रधान कार्यालय "सेवा तीर्थ" मध्ये स्थलांतरित, साऊथ ब्लॉकमध्ये आज शेवटची बैठक

Latest Marathi News Live Update : वसई पूर्व कामन आयशा कंपाऊंडमध्ये आग लागली

Ladki Bahin Yojana e-KYC : लाडक्या बहिणींना गुड न्यूज! आता एकदमच मिळणार 6000 रुपये; 'ई-केवायसी'साठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

SCROLL FOR NEXT