कोकण

साहित्य संमेलनात आज लोककलांचा आविष्कार

CD

साहित्य संमेलनात आज
लोककलांचा आविष्कार
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २६ ः महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ अनुदानित आणि श्रीराम वाचन मंदिर आयोजित पहिल्या सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलनात उद्या (ता. २७) पहिल्या दिवशी सायंकाळी लोककलांचा आविष्कार पाहायला मिळणार आहे.
राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या केशवसूत साहित्यनगरीत होणाऱ्या या संमेलनात उद्या सायंकाळी ५.३० वाजल्यापासून लोककला सादरीकरण होणार आहे. यात आरपीडी हायस्कूलचा वारकरी जागर, आडवी गावच्या महिलांच्या पारंपरिक फुगड्या, पिंगुळी येथील एकनाथ गंगावणे यांच्या कळसूत्री बाहुल्यांचा खेळ, रामायण, सीता स्वयंवर तसेच देवसू गावच्या महिलांच्या व कारिवडे येथील गणपत परब यांच्या लोकगीतांचे सादरीकरण होणार आहे. याशिवाय संमेलनात कविवर्य आ. सो. शेवरे ग्रंथ दालन असून त्यात कोल्हापूर येथील महाराष्ट्र शासन ग्रंथ भांडार-साहित्य संस्कृती मंडळ प्रकाशित ग्रंथ, कणकवली येथील विघ्नेश प्रकाशन, गोवा येथील विचार ग्रंथ दालन तसेच सावंतवाडी येथील क्षितिज वितरणाचा स्टॉल आहे. साहित्य रसिकांनी या ग्रंथ दालनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train: प्लॅटफॉर्मवर पाऊल टाकताच जीव धोक्यात! मुंबईतलं 'हे' स्थानक बनलंय मृत्यूचा अड्डा? चार वर्षांची हादरवणारी कहाणी

Accident News: भीषण अपघातात भावाचा जागीच मृत्यू; बारावीचा पेपर देऊन बहिणीला घरी नेताना घटना, आई-वडीलांचा आक्राेश!

Nagpur Accident: पिकअपच्या धडकेत महिलेचा मृत्यू; पती गंभीर तुमसर-रामटेक मार्गावरील घटना

T20 World Cup Ind vs Namibia : मोठ्या विजयाचे भारताचे ध्येय; नामिबियाविरुद्ध अभिषेक शर्मा मुकण्याची शक्यता

Maharashtra political news : ‘राष्ट्रवादी’च्या विलीनीकरणाला खो! दिल्लीतील दोन मोठ्या नेत्यांच्या सल्ल्यानंतरच निर्णय

SCROLL FOR NEXT