-rat२६p३०.jpg-
२५O१३६४५
दापोली ः (कै.) कृष्णामामा महाजन स्मृती पुरस्कार सुप्रसिद्ध वैद्यकीय सेवक (कै.) डॉ. मधुकर लुकतुके यांना मरणोत्तर जाहीर झाला. हा पुरस्कार डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते स्वीकारताना डॉ. लुकतुके यांचे सुपुत्र केदार लुकतुके. यावेळी गंगाराम इदाते, बिपिन पाटणे.
-----
‘डॉक्टरांमधला देवमाणूस’ मरणोत्तर सन्मानित
दाभोळचे डॉ. मधुकर लुकतुके यांना कृष्णामामा महाजन स्मृती पुरस्कार प्रदान
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. २६ ः तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात मानाचा समजला जाणारा (कै.) कृष्णामामा महाजन स्मृती पुरस्कार यावर्षी दाभोळ येथील सुप्रसिद्ध वैद्यकीय सेवक (कै.) डॉ. मधुकर लुकतुके यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांचे सुपुत्र केदार लुकतुके यांनी स्वीकारला.
कोळथरे येथील कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा हा १४ वा पुरस्कार असून, त्याचे वितरण आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते दाभोळ येथे झाले. (कै.) कृष्णामामा महाजन यांच्या आरोग्य, समाजप्रबोधन, उद्योजकता व शिक्षण या विषयांवरील अभ्यास व कार्याची परंपरा जपत या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अप्रकाशित व्यक्तीला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. याच धर्तीवर, १९६० पासून २०२५ पर्यंत दाभोळ परिसरात निःस्पृह भावनेने आरोग्यसेवा देणारे (कै.) डॉ. मधुकर लुकतुके यांची निवड करण्यात आली.
डॉ. लुकतुके यांनी आपल्या दीर्घ सेवाकाळात कधीही आर्थिक मोबदल्याचा विचार न करता रुग्णाची गरज ओळखून उपचार केले. त्यामुळेच ते ‘डॉक्टरांमधला देवमाणूस’ आणि ‘बिनखुर्चीचे डॉक्टर’ म्हणून सर्वदूर परिचित होते. पुरस्कार स्वीकार समारंभात डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी सांगितले, कोकण ही नवरत्नांची खाण आहे, याची प्रचिती (कै.) कृष्णामामा महाजन आणि (कै.) डॉ. मधुकर लुकतुके यांच्या कार्यातून येते तसेच परिसरातील समाजहितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य प्रतिष्ठान करत आहे.
दापोलीकरांसाठी एक महत्त्वाची घोषणा करत प्रतिष्ठानच्या माध्यमातून दापोली तालुक्यात ‘आयुष्यमान केंद्र’ उभारण्यात येणार असल्याचे जाहीर केले. या केंद्रामुळे तालुक्यातील कोणताही गरजू रुग्ण शासकीय आरोग्य योजनांपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. डॉ. मृणाल गोंधळेकर यांनी सूत्रसंचालन केले. सीए कौस्तुभ दाबके यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. या वेळी प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष दीपक महाजन, प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, माजी आमदार डॉ. मोकल, दाभोळच्या सरपंच राखी तोडणकर, पंचक्रोशीतील विविध गावांचे सरपंच-उपसरपंच उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.