-rat२६p२७.jpg-
२५O१३५९६
रत्नागिरी : नवनिर्माण हायसकूलमध्ये कलाकृतींच्या कलादालनात पाहणी करताना विद्यार्थी.
--------
विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे रंगीत दर्शन
नवनिर्माण हायस्कूल ; विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ : नवनिर्माण हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून साकारलेल्या कलादालनामध्ये विविध कलाकृतींचे आकर्षक प्रदर्शन भरवण्यात आले. यातून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला व्यासपीठ मिळाले. या दालनाचे उद्घाटन नवनिर्माण शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष अभिजित हेगशेट्ये, संचालिका सीमा हेगशेट्ये, संचालक परेश पाडगावकर, मुख्याध्यापक उल्हास सप्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
वारली पेटिंग ही संकल्पना कलाशिक्षक निखिल कांबळे यांनी दिली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या आर्ट गॅलरीमध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेली निसर्गचित्रे, वस्तुचित्रे, कार्टून पेंटिंग, ग्लास पेंटिंग, कॅन्व्हास पेंटिंग, विविध विषयांवरील रेखाचित्रे, कल्पनाविश्व साकार करणारी चित्रे, विविध रंगसंगतीतून व्यक्त केलेल्या कलाकृतींचा समावेश आहे. प्रत्येक कलाकृतीत विद्यार्थ्यांची निरीक्षणशक्ती, कल्पनाशक्ती आणि सृजनशील दृष्टिकोन प्रकर्षाने दिसून आला. केवळ शैक्षणिक अभ्यासापुरते मर्यादित न राहता कला, संस्कृती व सृजनशीलतेला प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो तसेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडतो, असे मत अध्यक्ष हेगशेट्ये यांनी नमूद केले.
--------
चौकट १
कलादालनातील विजेते
कलादालनात विविध गटातील यश संपादन केले. निकाल असा- इयत्ता पहिली ते चौथी गट- प्रथम- जिया सूर्यवंशी, द्वितीय- याकूब बंद्री, तृतीय- गौरेश सावंत, उत्तेजनार्थ- अथर्व कोकरे, अस्मी ठाकूर. इ. पाचवी ते सातवी गट- प्रथम- रूद्र पाटणकर, तृतीय- विभव पाटणकर, तृतीय- उमर अलजी, उत्तेजनार्थ- आराध्य पालांडे, श्रेया सागवेकर. इ. आठवी ते बारावी गट- प्रथम- खेमराज गुप्ता, द्वितीय- सान्वी गवस, तृतीय- तीर्था पाटणकर, उत्तेजनार्थ- पूर्वा ढोपटे, सिया गजरा, मृदुला गुरव.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.