कोकण

मसुरेत वन, ग्रामस्थांकडून खवले मांजराला जीवदान

CD

13761

मसुरेत वन, ग्रामस्थांकडून
खवले मांजराला जीवदान

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २७ : तालुक्यातील मसुरे येथील देऊळवाडा-मठवाडी भागात एका घराच्या परसबागेतील जाळ्यात अडकलेल्या दुर्मीळ खवले मांजराची वनविभागाने ग्रामस्थांच्या मदतीने सुखरूप सुटका केली.
मठवाडी येथील रहिवासी प्रकाश सांडव-साळवी यांच्या परसबागेतील कंपाउंडला लावलेल्या जाळ्यात शुक्रवारी (ता. २६) सकाळी एक खवले मांजर अडकल्याचे दिसून आले. ही बाब सुदर्शन पुरी यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने प्रकाश साळवी यांना माहिती दिली. साळवी यांनी घटनास्थळी दाखल होत खवले मांजराला जाळ्यातून सोडवण्याचा प्रयत्न केला; मात्र जाळे घट्ट असल्याने त्यांना यश आले नाही. यानंतर विशाखा पुरी यांनी मालवण वनविभागाला माहिती दिली. मालवणचे वनपाल सदानंद परब यांनी तत्काळ दिवाकर बांबर्डेकर आणि त्यांच्या टीमला घटनास्थळी रवाना केले. वनविभागाची टीम पोहोचेपर्यंत प्रकाश साळवी, सुदर्शन पुरी, विशाखा पुरी, अंकित साळवी, शुभम मेस्त्री आणि तन्मय मेस्त्री या सर्वांनी खवले मांजराची पूर्ण काळजी घेतली. वनरक्षक बांबर्डेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या कौशल्याने जाळ्यात अडकलेल्या खवले मांजराला बाहेर काढले. वन्यजीव रक्षणासाठी मसुरेवासीयांनी केलेल्या या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Fraud Case : जयसिंगपुरात जादा परताव्याच्या आमिषाने पावणेसात कोटींची फसवणूक

Latest Marathi News Live Update : देशाच्या तपास यंत्रणांवर आमचा विश्वास नाही- संजय राऊत

Stock Market Today : शेअर बाजार लाल रंगात! IT शेअर्सला मोठा फटका, अमेरिकेचा परिणाम; कोणते शेअर्स घसरले?

Mumbai Crime: मुंबईत थरकाप उडवणारी घटना! रिक्षातून उतरली… तरीही पाठलाग सुरूच; अल्पवयीन तरुणीची अंगावर शहारे आणणारी आपबीती

कोकणच्या सागरी पराक्रमाचा पुरावा! वीरगळावर सापडले प्राचीन नौकायुद्धाचे जिवंत दृश्य, खारेपाटण ठरू शकते भविष्यातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ

SCROLL FOR NEXT