-rat२७p९.jpg-
P२५O१३७६५
राजापूर ः चित्रकला स्पर्धेमध्ये सहभागी होऊन चित्र काढताना विद्यार्थी.
---
‘कुणबी समाजोन्नती’तर्फे चित्रकला स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २७ ः मुलांच्या अंगभूत कौशल्याला चालना देण्याच्या उद्देशाने कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई विभागीय शाखा चेंबूर संलग्न कुणबी युवा मंडळ चेंबूरतर्फे चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये ३७५ विद्यार्थी सहभागी झाले होते. छोटा शिशू ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित स्पर्धेतील विजेत्यांना पुढील महिन्यात गौरवण्यात येणार आहे.
या वेळी आमदार तुकाराम काते, समाजसेविका तन्वी काते, तुषार काते, अविनाश राणे, रवींद्र महाडीक, किशोरी कडू, तुषार सामंत, कुणबी समाजोन्नती संघ कार्यकारिणी सदस्य भास्कर चव्हाण, चेंबूर शाखा अध्यक्ष प्रभाकर नागरेकर आदी उपस्थित होते.
वर्धापन दिनानिमित्ताने ही चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. छोटा शिशू ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या या स्पर्धेसाठी प्रत्येक ग्रुपसाठी वेगवेगळे विषय देण्यात आले होते.