-Rat२७p६.jpg-
२५O१३७४४
दहागाव : शिक्षक किशोर कासारे लिखित सगुणा ही कथा सादर करताना आर्या तांबुटकर.
-----
सगुणा कथेतून ग्रामीण
जीवनमुल्यांवर भाष्य
मंडणगड ः ग्रामीण विचारविश्वाचे आणि जीवनमुल्यांचे प्रभावी दर्शन घडवणारी सगुणा ही कथा साधेपणा, समाजाभिमुखता, करुणा व शिक्षणप्रेमाचे प्रतीक ठरली. शिक्षक किशोर कासारे यांनी लिहिलेल्या ही कथा आर्या तांबुटकर या विद्यार्थिनीने सादर करून ग्रामीण जीवनमुल्यांवर नेमकेपणाने भाष्य केले. दहागाव येथील लालबहादूर शास्त्री हायस्कूल येथे सानेगुरुजी यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी सगुणा कथेमधील व्यक्तिरेखेतून ग्रामीण जीवनातील निरागसता, संघर्ष, स्त्रीशक्तीचे प्रतिबिंब आणि कष्टकरी समाजातील जगण्याची तत्त्वे अधोरेखित करण्यात आली. कासारे यांनी विद्यार्थ्यांना सानेगुरूजींच्या विचारांचे महत्त्व पटवून देत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी मानसी पालांडे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार मांडले.
युनायटेड स्कूलचे
३०, ३१ ला स्नेहसंमेलन
चिपळूण : युनायटेड इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन ३० व ३१ डिसेंबरला गुरूदक्षिणा सभागृहात होणार आहे. मंगळवारी (ता. ३०) सकाळी ८ वा. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन, चित्रप्रदर्शन व फनी गेम्स होणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे माजी विद्यार्थी प्रशांत पटवर्धन यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी ३ वा. पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम होतील. ३१ ला सकाळी पावणेआठ वाजता रंगोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला ओंकार बापट, उदयकुमार सन्नाक आणि योगेश बांडागळे उपस्थित राहणार आहेत. बापट हे निसर्ग वाचनाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर दुपारी ३ वा. पुन्हा विविध गुणदर्शन कार्यक्रम होणार आहेत. या दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमांना पालक, विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध, तसेच विद्यार्थी प्रतिनिधी शतांशू शिंदे व वेदिका कदम यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.