-rat२७p१०.jpg-
२५O१३७६७
दापोली ः माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार स्वीकारताना सपत्नीक राजेश नरवणकर.
-----
राजेश नरवणकर यांचा गौरव
मालगुंडमध्ये वितरण; कुणबी सेवासंघाचा पुरस्कारही जाहीर
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. २७ ः रत्नागिरी येथील मालगुंड एज्युकेशन सोसायटीतर्फे दिला जाणारा (कै.) सदानंद बळीराम परकर स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार मुरूड येथील एन. के. वराडकर हायस्कूलमधील येथील सहाय्यक शिक्षक राजेश बाळकृष्ण नरवणकर यांना प्रदान करण्यात आला. तसेच दापोली येथील कुणबी सेवा संघातर्फे दिला जाणारा सेवावृत्ती शिंदे गुरुजी स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कारही जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण ११ जानेवारी २०२६ला दापोली येथे होणार आहे.
शैक्षणिक क्षेत्रातील प्रदीर्घ, निष्ठावान व गुणवत्तापूर्ण अध्यापन कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न तसेच शाळा व समाजाभिमुख उपक्रमातील सक्रिय सहभाग याची दखल घेऊन हा पुरस्कार नरवणकर यांना प्रदान करण्यात आला आहे. मालगुंड येथे माध्यमिक शिक्षण अधिकारी दीपक मेंगाणे, मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण झाले.