कोकण

आडाळी ग्रामपंचायतीतर्फे ''स्नेहबंध मेळावा'' उत्साहात

CD

13809

आडाळी ग्रामपंचायतीतर्फे
‘स्नेहबंध मेळावा’ उत्साहात
कळणे : निराधार व्यक्तींच्या जगण्याची ओळख होऊन मुलांवर सामाजिक संवेदनशीलतेचा संस्कार व्हावा, या उद्देशाने आडाळीत ‘जागर संवेदनांचा, संस्कार माणुसकीचा’ हा ज्येष्ठ नागरिक स्नेहबंध मेळावा नुकताच घेण्यात आला. प्रेम आणि करुणेचा संदेश देणाऱ्या नाताळ सणाच्या औचित्याने ग्रुप ग्रामपंचायत आडाळी-फोंडीयेतर्फे संविता आश्रम, पणदूर व ग्लोब ट्रस्ट आडाळीच्या सहकार्याने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत हा मेळावा झाला. यावेळी आश्रमातील निराधारांसोबत ग्रामस्थांनी स्नेहभोजन केले. आश्रमाचे श्री. कामत यांनी आश्रमातील निराधार, मनोरुग्ण व अनाथ मुलांच्या व्यथा मांडल्या. आजच्या तरुणांनी आश्रमात येऊन निराधारांचे जगणे समजून घ्यावे. आडाळी ग्रामपंचायतीने घेतलेला हा मेळावा स्तुत्य आहे, असे त्यांनी सांगितले. मेळाव्याचा उद्देश सांगताना सरपंच पराग गावकर यांनी, तंत्रज्ञानाच्या आहारी जाणाऱ्या नव्या पिढीतील मुलांमध्ये भावनिक रुक्षता येण्याचा धोका अधिक जाणवतो. त्यामुळे मुलांवर जाणीवपूर्वक संवेदनशीलतेचे संस्कार रुजवण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन सायली देसाई यांनी केले. शिक्षक संतोष गवस यांनी मनोगत मांडले. यावेळी आश्रमातील वृद्ध निराधारांसाठी संदीप परब यांचे काम बघून उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे आर्थिक मदत केली. श्री. कामत यांनी सर्वांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train: प्लॅटफॉर्मवर पाऊल टाकताच जीव धोक्यात! मुंबईतलं 'हे' स्थानक बनलंय मृत्यूचा अड्डा? चार वर्षांची हादरवणारी कहाणी

Accident News: भीषण अपघातात भावाचा जागीच मृत्यू; बारावीचा पेपर देऊन बहिणीला घरी नेताना घटना, आई-वडीलांचा आक्राेश!

Nagpur Accident: पिकअपच्या धडकेत महिलेचा मृत्यू; पती गंभीर तुमसर-रामटेक मार्गावरील घटना

T20 World Cup Ind vs Namibia : मोठ्या विजयाचे भारताचे ध्येय; नामिबियाविरुद्ध अभिषेक शर्मा मुकण्याची शक्यता

Maharashtra political news : ‘राष्ट्रवादी’च्या विलीनीकरणाला खो! दिल्लीतील दोन मोठ्या नेत्यांच्या सल्ल्यानंतरच निर्णय

SCROLL FOR NEXT