कोकण

चिपळूण-ठाकरे बंधू एकत्र आल्याचा चिपळूणमध्ये जल्लोष

CD

ठाकरे बंधू एकत्र आल्याचा
चिपळूणमध्ये जल्लोष
चिपळूण, ता. २८ ः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती झाल्यानंतर चिपळुणात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. चिपळूण शहरात शिवसेना उद्धव नेते आणि आमदार भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला.
याप्रसंगी शिवसेना आमदार भास्कर जाधव म्हणाले, ठाकरे शिवसेना आणि मनसे युती व्हावी हे मी अगोदरपासून सांगत होतो. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले याचा सर्वाधिक आनंद बाळासाहेब ठाकरे यांना झाला असेल. मलाही या गोष्टीचा तेवढाच आनंद आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आणि कोकणामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांचा आदर राखला जाईल. त्यांना सन्मानाची वागणूक दिली जाईल.
भास्कर जाधव यांच्या संपर्क कार्यालयात जाधव येण्यापूर्वी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र जमले आणि घोषणाबाजी सुरू केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तुम आगे बढो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तुम आगे बढो अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. फटाक्यांची आतिषबाजी करून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात; चार वेळा कार झाली पलटी, चालक जागीच ठार, गाडीचे दरवाजे कापून मृतदेह काढला बाहेर

Trimbakeshwar Land Acquisition : "कवडीमोल दरात जमिनी नकोत!" त्र्यंबकेश्वरच्या शेतकऱ्यांचा कुंभमेळा कामांना विरोध

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्हा नियोजन समितीची आज पहिली बैठक

Aquarius Mahayog: कुंभ राशीत तयार होतोय दुर्लभ महायोग! ‘या’ राशींसाठी धोक्याची घंटा? जाणून घ्या संपूर्ण भविष्य

Nagpur News: सीईओ साहेब, केवळ एक सही द्या हो! शेकडो दिव्यांग विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ; जी. आर.चा फटका

SCROLL FOR NEXT