कोकण

राजापूर-मोहोर भरघोस, कणी अत्यल्प

CD

rat29p12.jpg-
14148
राजापूर ः मोहोराने फुलेलेले हापूस आंबा कलम.
rat29p26.jpg-
14203
राजापूर ः कलमांना मोहोर भरपूर आला असला तरी त्यावर कणीचे प्रमाण अत्यल्प दिसून येत आहे.
----------------

मोहोर भरघोस, कणी अत्यल्प
दवामुळे खार पडण्याची भीती; मोहोर काळा पडण्याची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २९ः गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या थंडीमुळे हापूस आंबाकलमे मोहोराने फुलली आहेत; मात्र, मोहोरावर कणीचे प्रमाण अत्यल्प दिसत आहे. रात्रभर पडणारी थंडी आणि सकाळी दवासोबत मोहोरावर खार पडत असल्याने आलेल्या कणीचे नुकसान होत आहे. त्यामुळे मोहोर जास्त असला तरी कणीचे प्रमाण कमी असल्याने बागायतदार चिंतेत आहेत.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पाऊस लांबला. आंबा कलमांना चांगलीच पालवी फुटली. त्यानंतर गेले १५ दिवस कडाक्याची थंडी पडत आहे. अनेक ठिकाणी तापमान १५ अंशापर्यंत खाली आले आहे. त्यामुळे आंबा कलमांना मोहोर आला आहे. त्यामुळे थ्रीप्स आणि तुडतुड्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आंबाबागांमध्ये कीटकनाशकांची फवारणी करताना दिसत आहेत. सद्यःस्थितीमध्ये मोहोराने आंबाकलमे फुलून गेली असली तरी, त्या मोहोरावर कणीचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी दिसत आहे. रात्रभर पडणारी कडाक्याची थंडी आणि पहाटेच्यावेळी पडणारे दव याचा प्रतिकूल परिणाम होत असून, मोहोरावर कणीचे अत्यल्प प्रमाण दिसत आहे. त्यामुळे अपेक्षित फळधारणा न झाल्यास फवारणीसह मशागतींवर होत असलेला खर्च वाया जाण्याची भीती बागायतदारांकडून वर्तवली जात आहे.

चौकट
मोहोरामध्ये नर फुलांचे प्रमाण जास्त !
हापूस आंबाकलमांना आलेल्या मोहोरांमध्ये चांगल्या फळधारणेसाठी नर फुले आणि मादी फुलांचे प्रमाण बहुतांश समसमान असणे अपेक्षित असते. मात्र, या वेळी आलेल्या मोहोरामध्ये मादी फुलांच्या तुलनेमध्ये नर फुलांचे प्रमाण जास्त असल्याचे मत आंबा बागायतदारांकडून वर्तवले जात आहे. मोहोरोमध्ये नर फुलांचे प्रमाण जास्त आणि मादी फुलांचे प्रमाण कमी राहिल्यास त्याचा फळधारणेसह एकूण आंबा हंगामातील आर्थिक उलाढालीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यताही बागायतदारांकडून वर्तवली जात आहे.

कोट
परतीच्या पावसानंतर यावर्षी आलेल्या थंडीने हापूस आंबाकलमे मोहोरली आहेत. मोहोर टिकावा, त्याचवेळी थ्रीप्सचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कीटकनाशकांची फवारणी करण्यात आली; मात्र, मोहोरातून अपेक्षित फळधारणा झालेली नाही. मोहोरावर कणीचे प्रमाण अत्यल्प दिसत असून, अतिथंडी आणि दव यामुळे ही कणी काळी पडून जात आहे. सध्याची प्रतिकूल स्थिती पाहता यावर्षीचा हापसू आंबा हंगाम आर्थिक उलाढालीच्यादृष्टीने अनिश्‍चित दिसत आहे.
- राकेश शिंदे, हापूस आंबा बागायतदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT