कोकण

प्रलंबित प्रश्‍नांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

CD

14239

प्रलंबित प्रश्‍नांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

प्राथमिक शिक्षक संतप्त; सिंधुदुर्गनगरीत ‘धरणे’

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २९ ः प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
जिल्हा परिषद शिक्षण विभागअंतर्गत कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघामार्फत प्रशासनाकडे वारंवार लेखी स्वरूपात पत्रव्यवहार करण्यात आला आहे. तसेच समक्ष तोंडी चर्चासुद्धा झाली आहे. मात्र, अद्यापपर्यंत प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक झालेली नसून कोणत्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद आजपर्यंत मिळालेला नाही. यामुळे प्राथमिक शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. गेली अनेक वर्षे लक्ष वेधूनही प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हा परिषदेसमोर दुपारी २ ते ६ या वेळेत धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी राजाराम कविटकर, गुरुदास कुबल, वंदना सावंत, महादेव देसाई यांच्यासह जिल्हाभरातील शिक्षक व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा परिषदेसमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनावेळी घोषणा देत उपस्थित आंदोलन करणाऱ्या शिक्षकांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी आपल्या विविध मागण्यांबाबतचे निवेदन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांना सादर केले आहे.
----------
प्रमुख मागण्या
* पदवीधर शिक्षकांच्या ७ व्या आयोगाप्रमाणे वेतनातील त्रुटी दूर करून कुल्लर समितीच्या शिफारशीनुसार वेतनातील तफावत दूर करून वेतन निश्चिती करणे
* गणित व विज्ञान विषय शिक्षक पदे कार्यरत शिक्षकांमधून पदोन्नती देऊन त्यांची वेतनश्रेणी तात्काळ मंजूर करणे
* २००५ पूर्वीच्या शासन अधिसूचनेनुसार रुजू झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे
* २०२२ पासूनचे प्रलंबित असलेले वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीचे प्रस्ताव तत्काळ मंजूर करणे
* विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक ही पदे पदोन्नतीने तात्काळ भरणे
* शालेय अभ्यासक्रम, तासिका, वेळापत्रक व शालेय वेळ याबाबत निर्देशानुसार तासिकेप्रमाणे शालेय वेळापत्रक निश्चित करणे
* शिक्षण सेवक कार्यकाल पूर्ण झालेल्या शिक्षकांना नियमित शिक्षक पदी आदेश देऊन वेतन निश्चिती करणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PMO Shift to Seva Teerth : प्रशासनात ऐतिहासिक बदल ! पंतप्रधान कार्यालय "सेवा तीर्थ" मध्ये स्थलांतरित, साऊथ ब्लॉकमध्ये आज शेवटची बैठक

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल घेतला पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आढावा

Ladki Bahin Yojana e-KYC : लाडक्या बहिणींना गुड न्यूज! आता एकदमच मिळणार 6000 रुपये; 'ई-केवायसी'साठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची घर घर थांबली! Mumbai Indians ची आडकाठी, तरीही RCB ला मिळालं हक्काचं होम ग्राऊंड

योगींचा गुंडांना थेट इशारा! होळीत राडा केला तर सरळ जेलमध्ये जाणार; सणासुदीच्या काळात यूपीमध्ये 'हाय अलर्ट'

SCROLL FOR NEXT