कोकण

गणपती साण्यावर भरणार चिमुकल्यांची चॉकलेटी दुनिया

CD

16521

गणपती साण्यावर भरणार चिमुकल्यांची चॉकलेटी दुनिया

कणकवलीत २४ ला ‘खाऊ गल्ली’; नलावडे मित्र मंडळाचा पुढाकार, विविध सांस्कृतिक कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ९ : शहरातील लहान मुलांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही समीर नलावडे मित्रमंडळातर्फे ‘लहान मुलांसाठी खाऊ गल्ली’ हा उपक्रम आयोजित केला आहे. शनिवार २४ जानेवारी रोजी सायंकाळी पाचला जानवली नदीवरील गणपती साणा येथे या कार्यक्रमाचा प्रारंभ पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. माजी नगराध्यक्ष तथा मंडळाचे अध्यक्ष समीर नलावडे यांनी ही माहिती दिली.
कणकवली येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री.नलावडे बोलत होते. यावेळी भाजप शहर अध्यक्ष अण्णा कोदे, राजू गवाणकर, राजा पाटकर, नवराज झेमणे, जावेद शेख, बाळा सावंत, राज नलावडे आदी उपस्थित होते. श्री.नलावडे म्‍हणाले, ‘या उपक्रमात सुमारे एक हजार लहान मुलांना प्रत्येकी ५० रुपयांचे कूपन मोफत देण्यात येणार असून, त्या माध्यमातून विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर खरेदी करता येणार आहे. स्थानिक व्यावसायिकांना फूड स्टॉल लावण्यासाठी मोफत जागा उपलब्ध करून देण्यात येणार असून, प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. कार्यक्रमस्थळी आलेल्या लहान मुलांना चॉकलेट वाटण्यात येणार असून त्यामध्ये आकर्षक बक्षिसांचाही समावेश असेल. विविध फनी गेम्स, जादूगारांचे मनोरंजन, गोव्यातील दोन कलाकारांकडून टॅटू काढण्याची सुविधा, तसेच दोन आकर्षक सेल्फी पॉईंटही या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत. मुलांसोबत आलेल्या पालकांसाठी मराठी व हिंदी गाण्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे.
-------------
...तरी शहरवासीयांप्रती बांधिलकी
कणकवली शहरातील नागरिकांनी माझ्या राजकीय जीवनात नेहमीच साथ दिली आहे. या नगरपंचायत निवडणुकीत मला ५ हजार ९६ मते मिळाली. ज्यांनी मला मतदान केले नसले, तेही माझेच कणकवलीकर आहेत. त्यामुळे पालक व मुलांच्या अपेक्षेनुसार आणि त्यांच्या प्रेमाखातर हा ‘खाऊ गल्ली’ कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला आहे. जरी सध्या पदावर नसलो, तरी कणकवलीकरांशी माझी बांधिलकी कायम आहे, असे नलावडेंनी स्पष्‍ट केले.
------
राणेंना सोडून कुठेही जाणार नाही!
आपल्‍या राजकीय भूमिकेबाबत बोलताना समीर नलावडे म्हणाले, की ‘माझे नेते खासदार नारायण राणे असून, माझा पक्षही तोच आहे. मंत्री नीतेश राणे आणि खासदार नारायण राणे यांना सोडून कुठेही जाणार नाही. तर स्वीकृत नगरसेवक व उपनगराध्यक्ष निवडणुकीत कुणाला संधी द्यायचा याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

leopard Attack: हृदयद्रावक घटना! चार वर्षांच्या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू; गोंदियात जीव मुठीत धरून मुले घरातच, सहानंतर सामसूम!

Latest Marathi News Live Update : बीडच्या ऊसतोड मजूर गणेश डोंगरे यांच्या कुटुंबाला न्याय; आंदोलनानंतर कारखान्याकडून २१ लाखांची मदत

Ladki Bahin Yojana : काँग्रेसच्या पत्रानंतरही मकर संक्रातीला लाडक्या बहीणींना पैसं मिळणार? CM फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर देत विषयच मिटवला...!

IND vs NZ, 1st ODI: शुभमन गिलने जिंकला टॉस; भारताच्या संघात ६ गोलंदाजांची निवड, पाहा प्लेइंग इलेव्हन

Aquarius Yearly Horoscope : कुंभ राशीला साडेसातीचा त्रास, पण यंदाच्या वर्षात नेतृत्व गुण उजळतील

SCROLL FOR NEXT