कोकण

पावस-पावसच्या गौतमी नदीवर नवीन पूल उभारणी

CD

rat11p31.jpg-
16973
पावस ः रत्नागिरी ते राजापूर या सागरी मार्गावरील येथील गौतमी नदीवर सुरू असलेले पुलाचे काम.
-----------------

पावसच्या गौतमी नदीवर नवीन पूल उभारणी
आठ कोटी मंजूर ; पर्यटकांसाठी फायदेशीर, रस्ता होणार रुंद
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ११ ः रत्नागिरी ते राजापूर या सागरी मार्गावरील गौतमी नदीच्या पुलाच्या बांधकामाला आठ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे या पुलाच्या कामाला सुरवात झाली आहे.
भाट्ये ते पूर्णगड या दरम्यान दळणवळणाच्या दृष्टीने पन्नास वर्षांपूर्वी गौतमी नदीवर पूल बांधण्यात आला. त्यामुळे या मार्गावर एसटीची व खासगी वाहतूक सुरू झाली. त्यावेळी पूर्णगड व रत्नागिरी या ठिकाणी खाडीवर पूल नव्हता. त्यामुळे या परिसरात येण्यासाठी लांजावरून रस्ता वाहतूक सुरू होता. अखेर या मार्गावर १९८५ मध्ये भाट्ये खाडी व १९९८ मध्ये पूर्णगड गावखडी खाडीवर पूल झाल्यानंतर रत्नागिरी ते राजापूर अशी वाहतूक सुरू झाली. त्यानंतर हा मार्ग सागरी मार्ग घोषित केल्यानंतर या मार्गावर काही ठिकाणी रुंदीकरण तर काही ठिकाणी पूल बांधण्यात आले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक वाढली आहे.
या मार्गावरून विजयदुर्ग, देवगड, मालवण, तारकर्ली, वेंगुर्ले येथून गोव्याला जात येते. हा सगळा सागरी महामार्ग असल्याने पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे हा रस्ता चौपदरी होणार असल्याने अनेक कामे सुरू आहे. त्यामुळे पावस चौकातील हा गौतमी नदीवरील पूल बांधण्यात येत आहे. यासाठी आठ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला. त्याचे भूमिपूजन झाले असून कामाला सुरवात करण्यात आली. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी या नवीन पुलाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas: सिलिंडर बुकिंगसाठी शहरात २५ दिवसांची अट; तर ग्रामीण भागात किती दिवस लागणार? संसदेत एलपीजी पुरवठ्याबाबत मोठा खुलासा

Team India Cricket Schedule: २० वन डे, २१ ट्वेंटी-२०, १० कसोटी अन् Asian Games; भारताचे पुढील १२ महिन्यांचे क्रिकेट कॅलेंडर

Latest Marathi News Live Update : नंदूरबारमध्ये जखमी अवस्थेत सापडले बिबट्याचे बछडे; वनविभागाकडून उपचार सुरू

Middle East War: पश्चिम आशियातील युद्धामुळे एलपीजीनंतर आता सीएनजीची टंचाई! ऑटो-रिक्षा भाडे वाढले; नवे दर किती?

मुस्लिम हिंदूंपेक्षा चांगला कसा? मुमताज यांच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया; म्हणाल्या- एकीला सोडून दुसरीशी लग्न...

SCROLL FOR NEXT