कोकण

बचत गटांना पंधरा लाख रुपयापर्यंत कर्ज देणार

CD

- rat13p2.jpg-
26O17387
दापोली ः परशुराम महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांचा सत्कार करताना माधव जोशी, मिलिंद जोशी, संस्थेचे अध्यक्ष सतीश जोशी, उपाध्यक्ष प्रतिभा दांडेकर, सचिव प्रदीप सोमण, अध्यक्ष डॉ. राजकुमार बर्वे, रामकृष्ण बर्वे आदी.
-----
बचतगटांना पंधरा लाखांपर्यंत कर्ज देणार
आशिष दामले ः ब्राह्मण हितवर्धिनी सभेचा स्नेहमेळावा उत्साहात, परशुराम महामंडळाची घोडदौड
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १३ : नवउद्योजक आणि बचतगट यांच्याकरिता १५ लाखांपर्यंत तातडीचे कर्ज उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे तरुणांनी नोकरी करणारे होण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा, असे आवाहन परशुराम महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांनी केले.
दापोली तालुका ब्राह्मण हितवर्धिनी सभेच्या ४०व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित वार्षिक स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. हा कार्यक्रम साखळोली येथे झाला. या प्रसंगी मंत्रिपदाचा दर्जा असलेले दामले यांनी परशुराम महामंडळाच्या योजनांची माहिती दिली. ते म्हणाले, गेल्या दीड वर्षांमध्ये परशुराम महामंडळाने जोरदार घोडदौड केली आहे. अनेक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. आपल्या महामंडळाचा आदर्श अन्य लोकांनी घेतला पाहिजे, असे पारदर्शी, प्रामाणिक आणि तत्पर काम करत आहोत.
व्यासपीठावर माधव जोशी, मिलिंद जोशी, संस्थेचे अध्यक्ष सतीश जोशी, उपाध्यक्ष प्रतिभा दांडेकर ,सचिव प्रदीप सोमण, पंचक्रोशी अध्यक्ष डॉ. राजकुमार बर्वे, रामकृष्ण बर्वे आदी उपस्थित होते. दापोली तालुका ब्राह्मण मेळाव्याप्रसंगी टिळक स्मारक मंदिर दापोली नियोजित नूतन वास्तूच्या आराखड्याचे अनावरण दामले यांच्या हस्ते करण्यात आले. या संदर्भात युवानेते अक्षय फाटक यांनी सविस्तर विवेचन करून उपस्थितांना देणगीचे आव्हान केले.
प्रास्ताविकातून प्रदीप सोमण यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच प्रतिवर्षी सूर्यनमस्कार व दोरीउड्या, पाठांतर स्पर्धा, श्रावण्या आदी कार्यक्रम गेली चाळीस वर्षे नेमाने होत असल्याची माहिती दिली. तसेच योग शिबिर आणि वेदपाठ शाळेच्या आयोजनाबाबत संस्था विचाराधीन असल्याची माहिती त्यांनी दिली. यजमानपद भूषवलेले पंच दशक्रोशी ब्राह्मणसभा संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजकुमार बर्वे यांनी मेळावा यशस्वी करण्याकरिता ब्राह्मणसभेने विश्वास दर्शवल्याबद्दल आभार व्यक्त केले.
----
यांचा केला सन्मान
वेद अध्ययन करणाऱ्या मिहीर पेंडसे याचा सन्मान करण्यात आला. तसेच कोकण कृषी विद्यापीठ येथून शिक्षण संचालक पदावरून निवृत्त झालेले डॉ. मकरंद जोशी, कॉर्पोरेट क्षेत्रातील उच्चपदावरून निवृत्त झाल्यानंतर समाजसेवा आणि लेखन करण्यात आपले जीवन व्यतीत करणारे माधव जोशी डोंबिवली, महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालय तेथे मुख्य सचिव म्हणून कार्यरत असलेले शिवदर्शन साठे मुंबई आणि समाजसेवा, पत्रकारिता, लेखन, व्याख्याने, पर्यावरण संवर्धन अशा विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे आणि कोलंबो विद्यापीठाने मानद डॉक्टरेट देऊन सन्मानित केलेले डॉ. प्रशांत परांजपे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZP Election 2026 : उर्वरित २० जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचं काय? कधी होणार घोषणा? वाचा...

Voter List: नवीन मतदारांसाठी महत्त्वाची माहिती! मतदार यादीत नाव आहे की नाही? अशा प्रकारे करा खात्री

Crime News : सटाण्यात 'देहविक्रय' करणाऱ्या टोळीला बेड्या; पोलिसांनी १६ हजारांच्या मुद्देमालासह तिघांना पकडले

Alandi Municipal Council : 'बुके ऐवजी बुक' देऊन नवनिर्वाचित नगरसेवकांचे स्वागत; आळंदी पालिकेत भाजपचे निर्विवाद वर्चस्व!

Pune News : चतुःश्रृंगी मंदिरासमोर बेघरांचा ठिय्या; शेकोट्यांमुळे प्रदूषणात वाढ आणि भाविकांची सुरक्षितता धोक्यात!

SCROLL FOR NEXT