कोकण

गोविंदराव निकम यांच्या जयंतीनिमित्त १६ पासून सावर्डेत क्रायक्रम

CD

- rat१३p४.jpg-
OP26O17389
गोविंदराव निकम

गोविंदराव निकम यांच्या जयंतीनिमित्त
शुक्रवारपासून सावर्डेत कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. १३ : सह्याद्री शिक्षणसंस्थेचे संस्थापक, माजी खासदार स्व. गोविंदराव निकम यांच्या ९१व्या जयंतीनिमित्त १६ व १७ रोजी सावर्डे येथील स्मृतिगंध या स्मारकस्थळी जयंती महोत्सवाचे आयोजन केले आहे. महोत्सवाची सुरुवात १६ रोजी सकाळी १० वा. होणार आहे. या वेळी दीपस्तंभ फाउंडेशन, जळगावचे संस्थापक अध्यक्ष यजुर्वेद महाजन तसेच चित्रपट व नाट्य अभिनेत्री गार्गी फुले-थत्ते यांचे मार्गदर्शन आहे.
दीपस्तंभ फाउंडेशन मनोबलचे संस्थापक असलेले यजुर्वेद महाजन हे शिक्षणक्षेत्रातील अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते आणि आंतरराष्ट्रीय वक्ता म्हणून परिचित आहेत. विद्यार्थी व शिक्षकांमध्ये वाचनसंस्कृती रूजवणे, स्पर्धा परीक्षांसाठी युवकांचा आत्मविश्वास वाढवणे आणि ‘अभ्यास मित्र–करिअर मित्र–पालकमित्र’ या भूमिकेतून मार्गदर्शन करणे हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य आहे तर मराठी चित्रपट, नाटक आणि दूरदर्शन मालिकांतील गार्गी फुले थत्ते यांच्या प्रेरणादायी विचारांची मेजवानी या निमित्ताने युवापिढीला मिळणार आहे. जयंती महोत्सव सोहळ्याची सुरुवात १६ रोजी सकाळी साडेआठ वाजता भक्तीसंगम सह्याद्री कलामंच प्रस्तूत गीतांजली कार्यक्रमाने होणार आहे. दुपारी ‘फक्त बसा आणि मनसोक्त हसा’ हा विशेष कार्यक्रम लोकशाहीर रणजीत आशा अंबाजी सादर करणार आहेत. संध्याकाळी ७ वा. भजनसंध्या सह्याद्री परिवार कर्मचारी वृंद यांच्यावतीने सादर केला जाणार आहे. १७ ला सकाळी साडेनऊ वाजता विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण होईल. या वितरण समारंभाला मराठी अभिनेते व हास्यजत्रा फिल्म प्रभाकर मोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे याच दिवशी सकाळी ११ वा. सह्याद्री बालकलाविष्कार व दुपारी दोन वा. सह्याद्री युवा कलाविष्कार सादर केला जाणार आहे. या ९१व्या जयंती महोत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे सचिव महेश महाडीक व महोत्सव आयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! प्रचार तोफा थंडावताच अजित पवारांच्या राजकीय सल्लागाराच्या कार्यालयावर छापा, कारण काय?

Thane News: ठाणे पालिका निवडणूक यंत्रणा सज्ज! १६ लाख मतदार बजावणार हक्क; दिव्यांग मतदारांसह ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सोय

Iran unrest : इराणमध्ये भयानक परिस्थिती! २००० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू; सरकारनेही पहिल्यांदाच केलं मान्य

Vijay Hazare Trophy: विदर्भाची सेमीफायनलमध्ये धडक, इशांत शर्माच्या दिल्लीला हरवलं; उपांत्य फेरीत पोहचले 'हे' ४ संघ

Latest Marathi News Live Update : रॅलीत झेंडा विजेच्या तारेस लागून स्फोट, कार्यकर्ता गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT