swt१४१७.jpg
17778
देवगडः तालुक्याचा मतदारसंघनिहाय आराखडा. (छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)
देवगडात इच्छुकांकडून चाचपणी
निवडणुकीचे पडघम; २१ जणांना मिळणार संधी
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १४ः तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघाचा निवडणूक बिगुल वाजला आहे. येत्या ५ फेब्रुवारीला मतदान तर ७ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. १६ पासून नामनिर्देशपत्र दाखल करण्याची सुरूवात होणार असल्याने तालुक्यात इच्छुकांकडून चाचपणी सुरु झाली आहे.
तालुक्यात मागील निवडणूकीपूर्वी ८ जिल्हा परिषद गट आणि १६ पंचायत समिती गण असे चित्र होते. मात्र २०१६ मध्ये देवगड जिल्हा परिषदेतंर्गत येणारे देवगड आणि जामसंडे पंचायत समिती गण यांची देवगड जामसंडे नगरपंचायत झाल्याने तालुक्यातील एक जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणारे दोन पंचायत समिती मतदारसंघ कमी झाले. उर्वरित ७ जिल्हा परिषद आणि १४ पंचायत समिती गण पकडून एकूण २१ जणांनाच आता संधी मिळणार आहे. मागील काही वर्षात राजकीय बरीच उलथापालथ झाली आहे. त्यातच राणेंच्या भाजप प्रवेशामुळे भाजपची तालुक्यातील ताकदही वाढली आहे. त्यामुळे भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी होण्याची शक्यता अधिक आहे. त्यातच शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष दुभंगल्याने त्यांना यावेळच्या निवडणूकीत मोठी कसरत करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे. मात्र, आरक्षणाने अनेकांचे मनसुबे उधळले आहेत तर काहींना नव्याने संधी प्राप्त होण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.
तालुक्यातील पुरळ जिल्हा परिषद गटातील पुरळ पंचायत समिती गणामध्ये येणाऱ्या पुरळ, हुर्शी, कळंबई, गिर्ये, बांदेगाव, फणसे, पडवणे तर तिर्लोट पंचायत समिती गणामध्ये येणाऱ्या तिर्लोट, मोहुळगांव, रामेश्वर, विजयदुर्ग, ठाकूरवाडी आदी गावांचा समावेश आहे.
उर्वरित मतदारसंघनिहाय गावांचा समावेश असा, पडेल गट -पडेल गण -पडेल, सौंदाळे, वाडाकेरपोई, वाडा, वाडातर, नाडण गण -नाडण, वीरवाडी, मोंड, चिंचवाड, वानिवडे, पावणाई, मोंडपार, बापर्डे गट -बापर्डे गण -बापर्डे, जुवेश्वर, मुटाट, वाघोटण, कसबा वाघोटण, मळेगाव, मणचे गण -मणचे, गोवळ, सोमलेवाडी, पाळेकरवाडी, रहाटेश्वर, गढीताम्हणे, पेंढरी, पोंभुर्ले गट -पोंभुर्ले गण -पोंभुर्ले, मालपेवाडी, धालवली, कुणकवण, पाटगांव, कोर्ले, उंडील, फणसगांव गण -फणसगांव, विठ्ठलादेवी, नाद, वाघिवरे, वेळगिवे, गवाणे, बुरंबावडे, ओंबळ, शिरवली, महाळुंगे, शिरगांव गट -शिरगांव गण -शिरगांव, निमतवाडी, धोपटेवाडी, शेवरे, साळशी, चाफेड, हडपीड, सांडवे, तळवडे गण -तळवडे, तळेबाजार, कुवळे, रेंबवली, आरे, तोरसोळे, वळिवंडे, चांदोशी, किंजवडे गट -किंजवडे गण -किंजवडे, दाभोळे, वरेरी, टेंबवली, कालवी, कट्टा, कोटकामते गण -दहिबांव, बागमळा, कोटकामते, शेरीघेरा कामते, इळये, पाटथर, लिंगडाळ, कुणकेश्वर गट -मुणगे गण -मुणगे, आडबंदर, हिंदळे, मोर्वे, नारिंग्रे, पोयरे, खुडी, मिठबांव गण -मिठबांव, कुणकेश्वर, कातवणेश्वर, मिठमुुंबरी, कातवण, तांबळडेग आदी गावांचा समावेश आहे.
चौकट
नव्या पिढीचा शिरकाव
मागील काही वर्षात निवडणूक झाली नसल्याने प्रशासकीय कारभार सुरू आहे. याकाळात राजकीय बरीच उलथापालथ झाली आहे. तसेच मागील राजकीय कारकिर्दीतील इच्छुकांमध्ये मोठा बदल झाला आहे. आता नव्या पिढीचा शिरकाव झाल्याने तसेच राजकीय संदर्भ बदलल्याने तत्कालीन इच्छुक मागे पडण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.