-rat१७p२.jpg-
२६O१८३६२
अन्विक्षा भेलेकर
-----------
एलिमेंटरी वस्तूचित्र विषयात
अन्विक्षा भेलेकर राज्यात दहावी
रत्नागिरी, ता. १९: महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाच्या शासकीय रेखाकला परीक्षा २०२५ मधील एलिमेंटरी ग्रेड परीक्षेत अन्विक्षा भेलेकर हिने उल्लेखनीय यश संपादन केले. तिने राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत ५३ वा क्रमांक पटकावला. ‘वस्तूचित्र’ विषयात राज्यात १०वा क्रमांक मिळवून आपली कला गुणवत्ता सिद्ध केली आहे. ती फाटक हायस्कूलची विद्यार्थी आहे. शिक्षक, पालक, मित्रपरिवार तसेच कलाप्रेमींनी तिचे कौतुक केले. फाटक हायस्कूल येथील कलाशिक्षक नीलेश पावसकर यांचेही तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे, सरावामुळे आणि योग्य तांत्रिक शिक्षणामुळे तिने वस्तूचित्र व इतर रेखाकलेच्या घटकांमध्ये प्रावीण्य मिळवले.