-rat१८p३६.jpg-
P२६O१८६७०
चिपळूण ः मार्गताम्हाने येथील मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी स्पर्धक.
------
‘एक धाव देशासाठी’ मॅरेथॉन उत्साहात
मार्गताम्हाने येथे १९०० स्पर्धकांचा सहभाग; विजेत्यांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १९ ः मार्गताम्हाने शिक्षण संस्था आयोजित देवी पद्मावती विद्यासंकुलात रविवारी (ता. १८) झालेल्या ‘प्रत्येक श्वास मातृभूमीसाठी- एक धाव देशासाठी’ या अंतर्गत सहावी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात झाली. या स्पर्धेत सुमारे १९०० स्पर्धक सहभागी झाले होते.
या वेळी आरजीपीपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल देसाई, मार्गताम्हाने शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकर चव्हाण, उपाध्यक्ष अजित साळवी, सर्व संचालक, मार्गताम्हाने खुर्द सरपंच दीपक चव्हाण, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब यादव, मुख्याध्यापक भाऊ लकेश्री, डॉ. मनोज रावराणे, मॅरेथॉन स्पर्धाप्रमुख डॉ. नामदेव डोंगरे, राकेश खांडेकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.
शिशु गटात मार्गताम्हाने सेमी इंग्रजी पूर्व प्राथमिक शाळा मुलांमध्ये अनुक्रमे सात्विक सूरज चव्हाण, स्वराज समीर कांबळे, शौर्य जितेंद्र बारस्कर, मुलींमध्ये कावेरी नंदन भडवळकर, नक्षत्रा प्रवीण हरवाडे, स्वर्णा अविनाश पवार यांनी क्रमांक मिळवला. १० वर्षाखालील मुले गटात राज सचिन पवार, सुजित संजय अश्मरे, आयुष अरुण पेजले, मुली गटामध्ये शर्वरी महेश तावडे, निधी राजेंद्र निवळकर, बोधिका कुंदन जाधव, १४ वर्षाखालील मुले गटात अवधूत अनंत सुर्वे, रवी रामराज कश्यप , गणराज शशिकांत डिंगणकर, मुलींच्या गटामध्ये इच्छा हरिचरण राजभर, मृणाली अंकुश खेराडे, कस्तुरी संतोष बेलोंडे, १८ वर्षाखालील मुले गटात पृथ्वी हरिचरण राजभर, वीर पांडुरंग मेटकर, रोहित शंकर राठोड, मुलींच्या गटामध्ये हुमेरा हुमायून सय्यद, भाविका सिकंदर शिंदे, प्रियांशी सचिन शितप, १८ वर्षावरील खुल्या गटात मुलांमध्ये स्वराज संदीप जोशी, संदीप विक्रांत जोयसी, ओमकार अनंत चांदिवडे, मुलींच्या गटामध्ये खुशी सोमनाथ हासे, योगिनी नवनाथ साळवी, तृप्ती अनिल गायकर या स्पर्धकांनी अनुक्रमे यश मिळवले. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.