कोकण

शासकीय रेखाकला परीक्षेत भंडारी हायस्कूलचा दबदबा

CD

swt195.jpg
18806
मालवण - रेखाकला परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांसोबत शिक्षक व मान्यवर.

शासकीय रेखाकला परीक्षेत
भंडारी हायस्कूलचा दबदबा
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १९ : शासकीय रेखाकला परीक्षेत येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूलने घवघवीत यश संपादन केले. या प्रशालेचा एलिमेंटरी परीक्षेचा निकाल १०० टक्के तर इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल ९३.२० टक्के लागला. प्रशालेच्या तीन विद्यार्थ्यांनी ‘अ’ श्रेणी तर १२ विद्यार्थ्यांनी ‘ब’ श्रेणी प्राप्त केली आहे.
एलिमेंटरी परीक्षेसाठी एकूण २२ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यामध्ये उर्विका मालंडकर हिने ''अ'', दीक्षा खवणेकर, लतिकेश तरवडकर, निर्मिती सरमळकर, निर्मिती घाडी, पार्थ सामंत, सानवी हिंदळेकर यांनी ''ब'' तर इतर १५ विद्यार्थ्यांनी ''क'' श्रेणी मिळवली. इंटरमिजिएट परीक्षेसाठी एकूण १५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यामधील १४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये प्रथमेश चव्हाण व वेदांत वायंगणकर यांनी ''अ'', धीरज जुवाटकर, मिथिल मालवणकर, नक्षत्रा जावकर, स्नेहा मसुरकर, उदित वाडेकर, यशस्वी कातवणकर यांनी ''ब'', ईशा कांबळी, मयुरेश पालव, मुग्धा सुर्वे, रिया भोगले, श्वेता पाटकर, वेदांत बिरमोळे यांनी ''क'' श्रेणी मिळविली. या सर्व विद्यार्थ्यांना कला शिक्षक मोरेश्वर गोसावी, श्री. आचरेकर, सेवानिवृत्त कलाशिक्षक अरविंद जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष विजय पाटकर, चेअरमन सुधीर हेरेकर, ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, मुख्याध्यापक हणमंत तिवले, पर्यवेक्षक आर. डी. बनसोडे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Seized Vehicles: पोलीस ठाणे, पोलीस यार्ड आणि रस्त्यांवरील जप्त वाहनांचा ढिगारा हटवा; राज्य सरकारचा मोठा आदेश, डेडलाईन काय?

बॉलिवूडने नाकारलं, बिझनेसने तारलं! विवेक ओबेरॉय कसा बनला कोट्यवधींचा मालक? नेमके कुठे गुंतवले पैसे? स्वतः सांगितला प्लॅन

TMC Election: ठाणे महापालिकेत ‘ती’चा आवाज! ६९ रणरागिणींनी लुटले विजयाचे वाण; शिवसेनेच्या सर्वाधिक ४० नगरसेविका

Pune Doctor Kidnapping : डॉक्टर अपहरण आणि खंडणी प्रकरणातील चार आरोपींना अटक; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त!

Latest Marathi News Live Update : नोएडाचे सीईओ आणि नोएडा मेट्रो कॉर्पोरेशनचे एमडी यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले

SCROLL FOR NEXT