कोकण

रत्नागिरीतील भोळे ऐतिहासिक चित्रपटात

CD

रत्नागिरीतील भोळे
ऐतिहासिक चित्रपटात
रत्नागिरी : ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या शिवराज अष्टकमधील सहावा ऐतिहासिक चित्रपट ३० जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात रत्नागिरीतील ज्येष्ठ कलावंत सुहास भोळे हे भिल्ल प्रमुखाच्या भूमिकेत आहेत. त्यांच्यासह रत्नागिरीतील अनेक कलावंत या चित्रपटात झळकणार आहेत. रत्नागिरीतील अमित तोडणकर, अर्जून बेंड्ये, ओंकार ठीक, गौरेश गवस, तेजस खरे, प्रदीप रेवाळे, महेश गिरकर, महेश पवार, यतीन नेवरेकर, राज डोर्लेकर, शरद आग्रे, शिवम पाटील, सखाराम घाणेकर, सचिन काष्टे, सचिन शितप, सौरभ घरट, स्वरूप हर्डीकर आदी कलावंतांच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक तसेच गीतकार स्वतः दिग्पाल लांजेकर असून, त्यांची एक महत्वाची भूमिका चित्रपटात आहे. निर्माते कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, विपुल अग्रवाल, जेनिल परमार व मुरलीधर छटवाणी हे आहेत. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अभिजित श्वेतचंद्र यांनी साकारली आहे. त्यांच्या सोबत मृणाल कुलकर्णी, पुन्नीत इस्सार, अजय पुरकर, योगेश सोमण, स्मिता शेवाळे, नुपुर दैठणकर आदी कलाकार आहेत.
---------
आचारसंहितेमुळे
लोकशाही दिन स्थगित
रत्नागिरी ः जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू असल्याने २ फेब्रुवारी रोजी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन होणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे उपजिल्हाधिकारी (सा. प्र) विश्वजित गाताडे यांनी कळवले आहे. जिल्हास्तरावर दर महिन्याला पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. फेब्रुवारी २०२६ चा लोकशाही दिन २ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी १ ते २ या वेळेत होणार होता. तथापि निवडणूक आयोगाकडील पत्रानुसार राज्यातील १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या तारखेपासून म्हणजेच १३ जानेवारीपासून निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंत जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू आहे.
--------
यंत्रसामग्री खरेदीसाठी
दरपत्रकाची मागणी
रत्नागिरी ः येथील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील यंत्रसामुग्री, फर्निचर (लाकडी/लोखंडी) यांची कोटेशन पद्धतीने विक्री करावयाची आहे. इच्छुक खरेदीदारांनी आपली निविदा बंद पाकिटातून प्राचार्य, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या कार्यालयात २८ जानेवारी रोजी दुपारी चार वाजेपर्यंत साहित्याची समक्ष पाहणी करून आणून द्यावीत, असे आवाहन संस्थेच्या प्राचार्यांनी केले आहे.

------
काटवली-ढोसळवाडी येथे
माघी गणेशोत्सव
संगमेश्वर ः काटवली-ढोसळवाडी येथे मोठ्या उत्साहात संपन्न होणारा माघी गणेशोत्सव म्हणजे एकात्मिक उत्सव उद्यापासून (ता. २२) सुरू होत आहे. उद्या गणेशमूर्तीची सायले येथून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची शोभा वाढावी यासाठी मंडळाने राम-रावण युद्ध-नृत्य स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील स्पर्धक सहभाग होणार आहेत. याशिवाय रत्नागिरी जिल्ह्यातील नावाजलेले शिवराज कलामंच रत्नागिरी श्री विराट नाट्य नमन मंडळाचे सादरीकरण २३ ला होणार आहे तसेच राम -रावण युद्ध-नृत्य स्पर्धा २४ ला होईल. २५ ला श्री वाघजाई नाट्य नमन मंडळ ओझरे गुरववाडी भक्तगणांच्या सेवेत दाखल होणार आहेत. २६ ला गणरायाला भक्तिभावाने निरोप देण्यासाठी भव्य मिरवणूक निघेल. यावर्षीची मूर्ती सायले गवळीवाडी येथील महाडिक कुटुंबीयांनी दिली आहे. पंचक्रोशीतील रुग्णांना आर्थिक मदत करण्यासाठी हे मंडळ कायम तत्पर असते. आतापर्यंत अनेक गरजू व्यक्तींना या मंडळाने मदत केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे ZP निवडणुकीत विजयी उमेदवारांची यादी, कोणत्या पक्षातून कोण जिकलं? वाचा एका क्लिकवर

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: जिल्हा पंचायत निवडणुकीत महायुतीचा मोठा विजय

Sindhudurg ZP Election Winner List 2026 : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणूक निकाल; वाचा कोण जिंकले? कोण हरले? पाहा विजयी उमेदवारांची यादी

Dharashiv ZP Election Results : धाराशिवच्या मिनी मंत्रालयावर कोणाचा झेंडा? पाहा जिल्हा परिषद निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

Parbhani ZP Election: परभणी जिल्हा परिषदेत कोणी मारली बाजी? पाहा आतापर्यंत विजयी झालेल्या उमेदवारांची यादी

SCROLL FOR NEXT