कोकण

संतांच्या स्पर्शाने माणूसपण उजळून निघते

CD

- rat२१p१०.jpg-
P२६O१९२०४
राजापूर ः शीळ येथे अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमात कीर्तन करताना डॉ. मनोहर गोरे तर दुसऱ्या छायाचित्रात उपस्थित भाविक.

संतांच्या स्पर्शाने माणूसपण उजळून निघते
डॉ. मनोहर गोरे ः वारकरी मंडळाच्यावतीने शीळ येथे हरिनाम सप्ताह
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २१ ः ‘देव आपल्या सर्वांच्या हृदयात वास करतो; पण त्याची अनुभूती घेण्यासाठी संतांच्या सहवासाची नितांत गरज असते. ज्याचे जीवन संतांच्या संगतीत व्यतीत होते त्याचेच जगणे खऱ्या अर्थाने सार्थ ठरते. फुलांच्या सहवासाने मातीला जसा सुगंध प्राप्त होतो तसा संतांच्या स्पर्शाने माणसाचे ‘माणूसपण’ उजळून निघते,’ असे भावपूर्ण उद्‍गार युवा कीर्तनकार डॉ. मनोहर गोरे यांनी काढले.
राजापूरजवळील मौजे शीळ येथे ‘वारकरी संप्रदाय प्रसारक मंडळा’च्यावतीने आयोजित पाचवा अखंड हरिनाम सप्ताहात ते बोलत होते. समाजातील व्यसनाधीनता दूर व्हावी आणि मानवी जीवनात अध्यात्माची ओढ निर्माण व्हावी या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित कीर्तनसेवा देताना डॉ. गोरे यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या ‘देव वसे चित्ती त्याची घडावी संगती।।’ या अभंगावर निरूपण केले. त्यांनी आपल्या निरूपणातून भक्तीचा महिमा विशद केला. देव प्रत्येकाच्या हृदयात आहेच; पण तो ‘असून’ चालत नाही तर त्याचे ‘भान’ असणे महत्त्वाचे आहे. लोखंडाचे सोने जसे परिसाच्या स्पर्शाने होते तसेच संतांच्या सहवासात राहिल्याने मनातील दोष दूर होऊन भक्तिमार्ग सोपा होतो. माणसाने केवळ भौतिक सुखांची वासना न धरता संतांच्या चरणांची ओढ धरली पाहिजे.
----
चौकट
शीळ परिसर दुमदुमला
सोहळ्यासाठी शीळ दशक्रोशीसह राजापूर तालुक्यातील असंख्य वारकरी व भाविक उपस्थित होते. टाळ-मृदंगाचा गजर आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषाने संपूर्ण शीळ परिसर दुमदुमून गेला होता. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वारकरी संप्रदाय प्रसारक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Fraud Case : जयसिंगपुरात जादा परताव्याच्या आमिषाने पावणेसात कोटींची फसवणूक

Latest Marathi News Live Update : देशाच्या तपास यंत्रणांवर आमचा विश्वास नाही- संजय राऊत

Stock Market Today : शेअर बाजार लाल रंगात! IT शेअर्सला मोठा फटका, अमेरिकेचा परिणाम; कोणते शेअर्स घसरले?

Mumbai Crime: मुंबईत थरकाप उडवणारी घटना! रिक्षातून उतरली… तरीही पाठलाग सुरूच; अल्पवयीन तरुणीची अंगावर शहारे आणणारी आपबीती

कोकणच्या सागरी पराक्रमाचा पुरावा! वीरगळावर सापडले प्राचीन नौकायुद्धाचे जिवंत दृश्य, खारेपाटण ठरू शकते भविष्यातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ

SCROLL FOR NEXT