कोकण

गुहागरमध्ये अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची भाऊगर्दी

CD

rat२१p२५.jpg-
२६O१९२७६
गुहागर ः भाजप-सेना युतीचे पदाधिकारी उमेदवारी अर्ज दाखल करायला जाताना.

गुहागरात भाजप-शिवसेना युती निश्चित
ठाकरेसेना स्वबळावर; शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. २२ : शहरात ठाकरे शिवसेनेच्यावतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती गणासाठी सर्व जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. तर ही निवडणूक भाजप-शिवसेना युतीद्वारे लढवणार आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची भाऊगर्दी सुरू होती.
भव्य शक्तीप्रदर्शन करत मिरवणूक काढून आमदार भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत उबाठा शिवसेनेच्यावतीने सर्व जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यामध्ये पडवे जिल्हा परिषद गटासाठी उबाठाचे तालुकाप्रमुख सचिन बाईत, वेळणेश्वर जिल्हा परिषद गटासाठी सिद्धी रामगडे, कोंडकारूळ जिल्हा परिषद गटासाठी मानसी घाणेकर, शृंगारतळी जिल्हा परिषद गट हा मनसेसाठी देण्यात आला असून, मनसेचे गुहागर संपर्कप्रमुख प्रमोद गांधी, असगोली जिल्हा परिषद गटासाठी आमदार भास्कर जाधव यांचे पुत्र व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे तसेच १० पंचायत समिती गणासाठी सर्व जागांवर उबाठा शिवसेनेचे उमेदवार दिले आहेत. यामध्ये पाचेरीसडा गणासाठी शशिकला मोरे, पडवे गणासाठी माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र आंबेकर, वेळणेश्वर गणासाठी युवासेना उपजिल्हाधिकारी सचिन जाधव, शीर गणासाठी जोन्सा काताळकर, कोंडकारूळ गणासाठी मुंबईचे संपर्क प्रमुख महेश गोवळकर, मळण गणातून साक्षी चव्हाण, शृंगारतळी गणासाठी संजय पवार, तळवली पंचायत समिती गणासाठी वडद ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप धनावडे, असगोली पंचायत समिती गणासाठी उर्वी खैर, अंजनवेल गणासाठी प्राजक्ता जांभारकर यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले.
भाजप-शिवसेना युतीच्यावतीने भव्य शक्तीप्रदर्शन करत मिरवणूक काढण्यात आली. या वेळी माजी आमदार डॉ. विनय नातू, तालुकाध्यक्ष अभय भाटकर, चिटणीस सचिन ओक, नगराध्यक्ष नीता मालप व शिवसेनेचे तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर, सरचिटणीस संतोष आग्रे, माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, शहरप्रमुख नीलेश मोरे, उपनगराध्यक्ष प्रदीप बेंडल यांच्यासह सर्व उमेदवार उपस्थित होते. भाजप-शिवसेना युतीच्यावतीने ४ जिल्हा परिषद व ९ पंचायत समिती गणासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये जिल्हा परिषद गटामध्ये पडवे गटातून शिवसेनेच्यावतीने माजी उपाध्यक्ष महेश नाटेकर, वेळणेश्वर गटासाठी नेत्रा ठाकूर तर भाजपकडून श्रुंगारतळी गटासाठी डॉ. राजेंद्र पवार तर कोंडकारूळ गटासाठी अपूर्वा बारगोडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. पंचायत समिती गणासाठी शिवसेनेकडून असगोली गणासाठी पूनम रावणंग, पाचेरीसडा गणासाठी सुचिता घाणेकर, श्रुंगारतळी गणासाठी गौरव वेल्हाळ, कोंडकारूळ गणासाठी प्रणव पोळेकर, वेळणेश्वर गणासाठी संदीप गोरिवले, भाजपाच्यावतीने पडवे गणासाठी जिल्हा सरचिटणीस नीलेश सुर्वे, तळवली गणासाठी मंगेश जोशी, मळण गणांसाठी मानसी रांगळे, शीर गणासाठी स्नेहा शिगवण यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Mallya: विजय मल्ल्याला भारतात यावंच लागणार… नाहीतर याचिकेचं काय? मुंबई उच्च न्यायालयाचा इशारा

Bhadra Tiger Reserve Video : दुर्मिळ योगायोग! भद्रा व्याघ्र प्रकल्पात ब्लॅक पँथर आणि बिबट्या एकत्र पाणी पितानाचा क्षण कॅमेऱ्यात कैद; VIDEO तुफान व्हायरल

"मरणाच्या दारात असताना त्यांनी मला इंजेक्शन दिलं" दिव्या शिंदेचे बिग बॉस टीमवर गंभीर आरोप; म्हणाली..

PNB Recruitment 2026: फ्रेशर्ससाठी नोकरीची सुवर्णसंधी! पंजाब नेशनल बँकमध्ये ५,१३८ पदांसाठी भरती सुरू; जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख

Latest Marathi News Live Update : पुण्यात मुख्यमंत्री फडणवीसांकडून अर्थसंकल्पीय नियोजनाचा ऑनलाईन आढावा

SCROLL FOR NEXT