- rat२७p२४.jpg-
P२६O२०२२७
दापोली ः जिल्हा पोलिसदलाने सुवर्णदुर्ग किल्ल्यावर तिरंगा डौलाने फडकवत संचलन केले.
- rat२७p२५.jpg-
OP२६O२०२२८
दापोली ः ध्वजवंदन कार्यक्रमासाठी सुवर्णदुर्ग किल्ल्यावर उपस्थित राहिलेले जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे. सोबत पोलिस निरीक्षक महेश तोरस्कर, नितीन ढेरे, अश्वनाथ खेडकर, मत्स्यविभाग व बंदर विभागाचे कर्मचारी, पोलिस पाटील आदी.
-----
जिल्ह्यातील सहा निर्जन बेटांवर ध्वजवंदन
प्रजासत्ताक दिनी रत्नागिरी पोलिसांची विशेष मोहीम ; सुवर्णदुर्ग किल्ल्यावर संचलन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ : भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी पोलिसदलाने जिल्ह्याच्या सागरी हद्दीतील महत्त्वाच्या बेटांवर विशेष मोहीम राबवत ध्वजवंदन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सागरीसुरक्षा बळकट करण्याचे आदेश दिले आहेत. त्याला अनुसरून जिल्ह्यातील निर्जन बेटांवर पोलिसांनी केवळ तिरंगाच फडकवला नाही तर त्या ठिकाणी रात्र वास्तव्य करून ‘सागरी सीमा सुरक्षित’ असल्याचा संदेश दिला.
डीजीपी-आयजीपी यांच्या २०२४ मध्ये झालेल्या परिषदेत पंतप्रधानांनी देशाच्या सागरीसुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील निर्जन बेटांवर दरवर्षी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी ध्वजवंदन करावे आणि त्या ठिकाणी पोलिसांनी रात्र वास्तव्य करावे, असे आदेश दिले होते. या मोहिमेमुळे निर्जन बेटांवर सुरक्षा यंत्रणांची उपस्थिती वाढून घुसखोरी किंवा बेकायदेशीर हालचालींना आळा बसणार आहे. जिल्ह्यात १५ बेटे असून, त्यापैकी १३ बेटे निर्मनुष्य आहेत. या विशेष मोहिमेअंतर्गत प्रजासत्ताक दिनी महत्त्वाच्या बेटांवर यशस्वीरित्या ध्वजवंदन कार्यक्रम करण्यात आला. त्यात सुवर्णदुर्ग किल्ला (बेट), हर्णै (दापोली), बाबा मलंग दर्गा (खेड), जुवाड पेठ बेट, गोवळकोट (चिपळूण), जुव्याचे पेंद, कुरधुंडा (संगमेश्वर), जुवे बेट, बुरंबेवाड (नाटे), वाकडवन, कोंडसर (नाटे) या बेटांचा समावेश आहे.
दापोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ऐतिहासिक सुवर्णदुर्ग किल्ल्यावर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी पोलिसदलाच्यावतीने तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. या कार्यक्रमाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे, दापोलीचे पोलिस निरीक्षक महेश तोरस्कर, जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक अश्वनाथ खेडकर, मत्स्यविभाग व बंदर विभागाचे कर्मचारी, पोलिस पाटील, माजी सैनिक आणि एनसीसीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-----
चौकट
...तत्परता सिद्ध
या उपक्रमातून केवळ उत्सव साजरा न करता राष्ट्रीय सार्वभौमत्व आणि अखंडता जपणुकीचा महत्त्वाचा संदेश देण्यात आला. दुर्गम आणि निर्जन बेटांवर पोलिसदलाची प्रभावी उपस्थिती दर्शवून सागरी सीमांच्या सुरक्षेबाबत रत्नागिरी पोलिसांनी आपली तत्परता सिद्ध केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.