कोकण

सावंतवाडी पालिकेचा पाणीप्रश्नाकडे दुर्लक्ष

CD

swt2727.jpg


साक्षी वंजारी

सावंतवाडी पालिकेचा पाणीप्रश्नाकडे दुर्लक्ष
साक्षी वंजारी ः तातडीने उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २७ ः शहरात काही भागात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. उभाबाजार परिसरात गेल्या तीन दिवसांपासून पाणीच आले नसून सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाचे पूर्णतः याकडे दुर्लक्ष आहे. टँकरची मागणी करूनही प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळत नाही, अशी टीका काँग्रेस जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी यांनी केली. सत्ताधाऱ्यांनी येत्या तीन महिन्यांत शहरातील विविध प्रश्न मार्गी लावून नागरिकांना अपेक्षित असे काम करावे; अन्यथा नागरिकांच्या प्रश्नासाठी प्रसंगी आंदोलनात्मक भूमिका हाती घेऊ, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
सौ. वंजारी यांनी आज येथे पत्रकार परिषद घेत पालिका प्रशासन आणि सत्ताधारी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह नगरसेवकांवर टीका केली. त्या म्हणाल्या, ‘‘सावंतवाडी शहरातील काही भागात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. बाजार परिसरामध्ये दैनंदिन वापरासाठी सुद्धा पाणी मिळत नाही. या प्रश्नाकडे तेथील नगरसेवकांचे दुर्लक्ष झाले आहे. प्रशासनाला फोन केला असता समाधानकारक उत्तर मिळत नाही. मुख्याधिकारी तर फोनच उचलत नाही. त्यामुळे नागरिकांनी दाद मागावी कोणाकडे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.​ पाण्यासोबतच प्रभागातील स्वच्छतेचा प्रश्नही ऐरणीवर आला असून इतर प्रभागांमध्ये नियमित साफसफाई होत असताना उभाबाजार परिसरात मात्र स्वच्छता मोहीम राबवली जात नाही. ठिकठिकाणी रस्ताकामे सुरू आहेत; परंतु या कामांकडे सुद्धा सत्ताधारी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. पाणी प्रश्नावर टँकरसारखी उपयोजना असताना त्याचाही विचार केला जात नाही. त्यासाठी फोन केला असता समर्पक उत्तरे मिळत नाहीत. या सर्व विषयांवर सत्ताधाऱ्यांनी तीन महिन्यांत तोडगा काढावा; अन्यथा आंदोलनात्मक पवित्र घेऊ.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘आपण चुकीच्या दिशेने तर जात नाही ना?’ ; UGC नियमांवर CJI सूर्यकांतांचा थेट सवाल! जुने नियम कायम ठेवण्याचा निर्णय

Latest Marathi News Live Update : वाघोलीत मद्यधुंद स्कूल बस चालकाची चार दुचाकी व कारला धडक

स्टार प्रवाहनंतर अभिनेत्याची झी मराठीच्या मालिकेतही एंट्री; एकाच वेळी दोन लोकप्रिय सिरीयलमध्ये साकारतोय भूमिका

अजिंक्य रहाणे संतापला, पाकिस्तानला सुनावले! म्हणाला, T20 World Cup वर बहिष्काराची भाषा कसली करताय, तेवढा दम...

Asherigad Fort Trek: ट्रेकर्स आणि इतिहासप्रेमींना आवडेल असा ‘अशेरीगड’ ; कसा पोहोचाल ते जाणून घ्या

SCROLL FOR NEXT