कोकण

देवगडात भाजप सत्तेच्या उंबरठ्यावर

CD

देवगडात भाजप सत्तेच्या उंबरठ्यावर
पंचायत समितीच्या सहा जागा बिनविरोध; बहुमतासाठी केवळ दोन जागांची गरज
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २९ ः तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीत मतदान होण्याआधीच उमेदवार बिनविरोध करून भाजपने आघाडी घेतली आहे. पंचायत समितीचे सहा उमेदवार बिनविरोध करून भाजप सत्तेच्या समीप गेली आहे. आता पंचायत समितीमध्ये भाजपला सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा आकडा गाठण्याकरिता केवळ दोन जागांचीच आवश्यकता असून त्यादृष्टीने रणनिती सुरू आहे.
तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ७ तर पंचायत समितीच्या १४ जागा आहेत. अंतिम दिवसापर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्यात आल्याने बापर्डे, पडेल, किंजवडे आणि पोंभुर्ले असे एकूण ४ जिल्हा परिषद गट तर पडेल, नाडण, बापर्डे, फणसगांव, शिरगांव आणि कोटकामते असे एकूण ६ पंचायत समिती गण बिनविरोध ठरले आहेत. या सर्व ठिकाणी भाजपची सरशी झाली आहे. पंचायत समितीमध्ये सत्ता मिळवण्यासाठी ८ सदस्यांचा बहुमतासाठीचा आकडा आहे. सद्यस्थितीत भाजपने ६ जागा बिनविरोध करून आघाडी घेतली आहे. त्यांना बहुमताचा आकडा गाठण्यासाठी केवळ दोन जागांचीच आवश्यकता आहे. त्यामुळे भाजपची त्यादृष्टीने रणनिती सुरू झाली आहे. भाजपचे आणखी दोन उमेदवार निवडून आल्यास पंचायत समितीमध्ये भाजपची निर्विवाद सत्ता येऊ शकते. पंचायत समितीच्या पुरळ, तिर्लोट, मणचे, पोंभुर्ले, तळवडे, किंजवडे, मुणगे, कुणकेश्‍वर अशा एकूण ८ जागांवर निवडणूक होणार आहे. ८ जागांसाठी १६ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वच ठिकाणी दुरंगी लढत आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार हा औत्सुक्याचा विषय आहे. विरोधकांना पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापन करायची झाल्यास निवडणूक होणार्‍या सर्वच जागी त्यांना विजय मिळवावा लागेल. बहुमताचा आकडा ८ आणि निवडणूक होणार्‍या ८ जागाच असल्याने भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे झाल्यास विरोधकांना मोठी कंबर कसावी लागेल. मात्र भाजपला केवळ दोन जागांचीच आवश्यकता असल्याने पक्षीय पातळीवर त्यादृष्टीने प्रचार यंत्रणा सक्षमपणे राबवली जावू शकते. भाजप सत्तेच्या समीप असल्याने बहुमताचा आकडा गाठण्यासाठी त्यांना अधिक मेहनत घेण्याची आवश्यकता सध्यातरी कमी दिसते.

चौकट
सभापतीसाठी चुरस शक्य ?
भाजप सत्तेच्या जवळ असल्याने सभापतीपद मिळण्याच्या अनुषंगाने पक्षांतर्गत आगावू रणनिती आखली जावू शकते. निवडणूक होत असलेल्या पुरळ, तिर्लोट, मणचे, पोंभुर्ले, तळवडे, किंजवडे, मुणगे, कुणकेश्‍वर या आठ जागांपैकी मणचे आणि कुणकेश्‍वर या दोन जागा महायुतीचा घटकपक्ष असलेल्या शिंदे शिवसेनेकडून लढवल्या जात आहेत. त्यामुळे पंचायत समितीमध्ये भाजपची सत्ता येण्यास वाव असला तरी महायुतीच्या फार्मुल्यानुसार कदाचित उपसभापतीपद शिंदे शिवसेनेकडे जावू शकते. मात्र शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांना उपसभापती पदापर्यंत पोचण्यासाठी विजय मिळवावा लागेल असे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

February 1 Rule Changes: १ फेब्रुवारीपासून सामान्यांच्या खिशावर परिणाम करणारे ५ मोठे बदल!

Crime: बोटं कापली, नाक गायब, शरीरावर अनेक वार अन्... १२ वीच्या विद्यार्थिनीला क्रूरपणे संपवलं, घरातील व्यक्तीवरच संशय

Sangli Jat Politics : महिला आरक्षणामुळे जाडरबोबलाद गटात राजकीय तापमान वाढले; सर्वच उमेदवार मैदानात आक्रमक

तिचं बालपण हरवलं... सतत होणाऱ्या ट्रोलिंगला कंटाळून मायरा वायकुळच्या पालकांनी घेतला मोठा निर्णय; नेटकरीही करतायत विचारपूस

Crime News : सीसीटीव्ही ठरला 'गेम चेंजर'! शिंदखेड्यात घरफोडी करणाऱ्या आंतरजिल्हा चोरट्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT