कोकण

सावंतवाडीत शिवसेनेतर्फे आनंद दिघेंना अभिवादन

CD

सावंतवाडीत शिवसेनेतर्फे
आनंद दिघेंना अभिवादन
सावंतवाडी : शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांचे विचार आणि आचार खऱ्या अर्थाने आत्मसात करणे आवश्यक आहे, असे आवाहन आमदार दीपक केसरकर यांनी केले. दिघे यांनी समाजाला जाज्वल्य विचारांची देणगी दिली, असेही त्यांनी सांगितले. सावंतवाडी येथे शिवसेनेतर्फे आमदार केसरकर यांच्या श्रीधर अपार्टमेंट येथील निवासस्थानी आनंद दिघे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आमदार केसरकर यांनी दिघे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. या कार्यक्रमाला माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण राणे, नगरसेविका शर्वरी धारगळकर, अ‍ॅड. सायली दुभाषी, स्नेहा नाईक, अभी सावंत, उमेश गावकर, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष रेडकर, आंगणे, परीक्षित मांजरेकर आदी उपस्थित होते.
----------------
मुंबई येथे उद्या
नाभिक मेळावा
मालवण : मुंबई नाभिक बांधव संघटना, सिंधुदुर्ग यांच्यावतीने नोकरी व व्यवसायानिमित्त मुंबई–पुणे येथे वास्तव्यास असलेल्या नाभिक बांधवांचा दुसरा स्नेहमेळावा शनिवारी (ता.३१) दादर, मुंबई येथे आयोजित केला आहे. हा कार्यक्रम अध्यक्ष अरुण गणपत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. जिल्ह्यातील नाभिक बांधवांनी एकजुटीने संघटित राहावे, परस्पर सहकार्य वाढावे या उद्देशाने २०२४ मध्ये गणेश चव्हाण यांनी या संघटनेची स्थापना केली आहे. संघटनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त दुपारी २.३० ते ७.३० या वेळेत स्नेहमेळावा, समाजातील मान्यवरांचे मार्गदर्शन, हळदीकुंकू आणि ‘नाभिक जन्म’ हे दशावतारी नाटक सादर केले जाणार आहे. या कार्यक्रमाला मनोज महाले, नितीन सवडतकर, सुधीर निकम, संतोष बिडवे, सचिन कस्तुरे, मंगेश गाडेकर, समाजसेवक अरुण शिंदे, सलून असोसिएशनचे संस्थापक दत्तात्रय चव्हाण, उद्योजक रमेश पवार, चित्रपट दिग्दर्शक दीपक यादव, डॉ. साहिल चव्हाण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
--------------
सावंतवाडी येथे
उद्या संगीत सभा
सावंतवाडी : चंद्रकांत घाटे मित्रमंडळ, सावंतवाडी यांच्यावतीने यंदा सलग २१ व्या वर्षी ज्येष्ठ हार्मोनियम व ऑर्गनवादक स्व. पं. गोविंदराव पटवर्धन यांच्या पुण्यस्मरणार्थ भव्य संगीतसभेचे आयोजन केले आहे. ही संगीतसभा ३१ जानेवारी रोजी आयोजित केली आहे. या कार्यक्रमात गोवा येथील अनय घाटे यांचे सोलो हार्मोनियम वादन तसेच सिंधुदुर्गातील युवा गायक हर्ष नकाशे यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन सादर होणार आहे. त्यांना हार्मोनियम साथ मंगेश मेस्त्री, तर तबल्याची साथ नीरज भोसले देणार आहेत. सूत्रसंचालन संजय कात्रे व गौरवी घाटे करणार असून, याचप्रसंगी बासरीवादक उमेश घाटकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. ही संगीतसभा श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी येथे सायंकाळी ५.३० ते ८.३० या वेळेत होणार आहे.
--------------
तिरोडा–नाणोसमध्ये
४-जी सेवा अखेर सुरू
सावंतवाडी : तिरोडा आणि नाणोस पंचक्रोशीतील ग्रामस्थांची गेल्या अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली असून, तिरोडा येथील बीएसएनएलचा ४जी टॉवर कार्यान्वित करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. सुमारे पाच वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या या टॉवरची उभारणी दहा महिन्यांपूर्वी पूर्ण झाली होती. मात्र तांत्रिक अडचणींमुळे सेवा सुरू होऊ शकली नव्हती. नेटवर्कअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते तसेच ऑनलाइन कामांवर परिणाम होत होता. नाणोस ग्रामपंचायत सदस्य सागर नाणोसकर यांनी २६ जानेवारी रोजी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर बीएसएनएल प्रशासनाने तातडीने हालचाली करत टॉवरची सेवा सुरू केली. या यशाबद्दल सागर नाणोसकर व पाठपुरावा करणाऱ्या ग्रामस्थांचे परिसरातून कौतुक होत आहे.
---------------
विषय समिती
निवडणूक स्थगित
मालवण : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे मालवण नगरपालिकेत बुधवारी आयोजित करण्यात आलेली विषय समिती निवडणुकीची विशेष सभा स्थगित करण्यात आली आहे. याबाबतची माहिती प्रशासनाकडून नगरसेवकांना देण्यात आली आहे.
------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EU takes action against IRGC : युरोपियन युनियनने ‘इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’ला दहशतवादी संघटना केलं घोषित!

Arijit Singh Possible to enter in Politics : अरिजीत सिंह राजकारणात करतोय एन्ट्री? ; पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ!

Ajit Pawar : दुकाने बंद ठेवत व्यापाऱ्यांनी अर्पण केली श्रद्धांजली, बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; बाजारपेठांत शुकशुकाट

Ajit Pawar :...ही दादांची सभा नव्हे दोस्ता, अखेरच्या निरोपाची वेळ आहे! विविध रंगछटा व हास्यमुद्रेतील दादांचे १२ फ्लेक्स पाहून कार्यकर्ते गहिवरले

T20 World Cup 2026 जिंकून सूर्यकुमारच्या नेतृ्त्वात टीम इंडिया इतिहास घडवणार? रवी शास्त्री म्हणाले, '१० मिनिटांचा खेळ...'

SCROLL FOR NEXT