कोकण

चुलीवरच्या पदार्थ विक्रीच्या व्यवसायाला झळाळी

CD

चुलीवरच्या भाकरीला वाढती मागणी
प्रीती लिंगायत यांचा व्यवसाय तेजीत ; महिलांना रोजगार संधी
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ३० ः आजच्या धावपळीच्या युगात स्वयंपाकासाठी गॅसचा वापर अनिवार्य झाला असला तरीही चुलीवरच्या पदार्थांची चव आजही खवय्यांच्या जिभेवर रेंगाळत आहे. हॉटेल असो वा घरगुती जेवण, ‘चुलीवरचं जेवण’ ही संकल्पना ग्राहकांना आकर्षित करू लागली आहे. शहरी भागात राहणाऱ्यांमध्ये ही क्रेझ वाढत असून चुलीवरच्या भाकऱ्या, मिसळ, भजी व बटाटेवडे त्याचबरोबर मांसाहारी पदार्थ बनवून देणाऱ्या व्यावसायिकांनी चांगला जम बसवण्यास सुरुवात केलेली आहे.
बदलत्या काळानुसार, स्वयंपाकघरात आधुनिक साधने आली असली तरी चुलीवरच्या धुराच्या सुगंधात तयार होणाऱ्या जेवणाची बातच काही वेगळी असते. मुंबई, पुण्यासह मेट्रोसिटीतून आलेल्या पर्यटकांकडून पावस आणि आडिवरे परिसरात सर्रास चुलीवरचे जेवण मिळेल का? अशी विचारणा केली जात आहे. त्याचाच फायदा घेऊन पावस येथील नाखरे-रामेश्वरवाडी येथील प्रीती लिंगायत यांनी २०१८ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर चुलीवरच्या भाकऱ्यांचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला केवळ हौस म्हणून सुरू केलेल्या या कामाला आता पूर्णवेळ व्यवसायाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दररोज २५० ते ३०० भाकऱ्या मागणीप्रमाणे हॉटेल किंवा खानावळींना त्या पोहोच करतात. स्वतःच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन निर्माण करतानाच त्यांनी गावातील इतर तीन ते चार महिलांनादेखील या व्यवसायातून रोजगार उपलब्ध करून दिला आहे. भाकरीसोबतच झुणका भाकर, उकडीचे मोदक आणि चपात्यांनाही ग्राहक पसंती देत आहेत. यामध्ये त्यांचे पती आणि सासूही सहकार्य करतात.
----
कोट
ग्राहकांना चुलीवरच्या भाकरीची चव अधिक आवडते, हे आम्हाला पर्यटकांकडून समजले. त्यातूनच हा व्यवसाय सुरू केला.
- प्रीती लिंगायत, महिला उद्योजिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Apple Valentine Offer : ‘अ‍ॅपल’ने लाँच केली ‘व्हॅलेंटाईन डे’ स्पेशल फेस्टिव्ह कॅशबॅक ऑफर!

Rohit Shetty Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळी झाडणारा अकोल्याचा; बिश्नोई टोळीच्या शुभम लोणकरने सोशल मीडियावर स्वीकारली जबाबदारी

Mohol Leopard News : मोहोळ शहरा नजीक आढळलेले बिबट्या सदृश्य प्राणी हे बिबटे नसून मार्जर कुळातील रान मांजर वनविभागाचा निर्वाळा

Social Media Impact : सोशल मीडियावर अर्ध-नग्नता; समाजाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम काय असू शकतो?

Ajit Pawar: ''ज्यांनी हे पाप केलं असेल त्यांच्या घरात...'', अमोल मिटकरींच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT