- rat३०p२.jpg-
P२६O२०८१३
राष्ट्रीय प्रदर्शनासाठी निवड झालेले प्रा. विक्रांते बोथरे यांचे चित्र.
-rat३०p३.jpg -
२६O२०८१४
प्रा. विक्रांत बोथरे
--------
विक्रांत बोथरे यांचे चित्र राष्ट्रीय प्रदर्शनात
‘सह्याद्री’ची मान उंचावली; आध्यात्मिक ऊर्जा, निसर्गाच्या मिलाफाचे चित्र
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ३० ः सावर्डे येथील सह्याद्री स्कूल ऑफ आर्टने आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे. बॉम्बे आर्ट सोसायटीच्यावतीने आयोजित १३४व्या ऑल इंडिया वार्षिक कला प्रदर्शनासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि प्रसिद्ध चित्रकार प्रा. विक्रांत बोथरे यांच्या कलाकृतीची निवड झाली आहे. भारताच्या कलाक्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या प्रदर्शनात निवड होणे, हा सह्याद्री शिक्षणसंस्थेसाठी मोठा बहुमान मानला जात आहे.
बॉम्बे आर्ट सोसायटी ही आशियातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित कला संस्था आहे. यावर्षीच्या १३४व्या प्रदर्शनासाठी देशभरातून हजारो ऑनलाइन प्रवेशिका दाखल झाल्या होत्या. त्यातून निवडक आणि दर्जेदार कलाकृतींची निवड तज्ज्ञ परीक्षकांमार्फत करण्यात आली. या स्पर्धेतून प्रा. विक्रांत बोथरे यांच्या चित्राने आपले स्थान निश्चित केले आहे.
‘डिवाइन एनर्जी विथ नेचर’ संकल्पनाप्रा. बोथरे हे केवळ एक कुशल चित्रकार नसून, ते लेखक आणि उत्तम मार्गदर्शकही आहेत. बोथरे यांनी जीडी आर्ट, डिपेएड आणि इंटिरियर डिझाईनर अशा पदव्या संपादन केल्या आहेत. पोर्ट्रेट, कॉम्पोजिशन, ॲबस्ट्रॅक्ट आणि लँडस्केप या सर्व विषयांवर त्यांचे प्रभुत्व आहे. पेन्सिल, चारकोलपासून ते वॉटरकलर, ॲक्रेलिक आणि ऑइल कलरपर्यंतच्या सर्व माध्यमांत ते लीलया संचार करतात. आध्यात्मिक ऊर्जा आणि निसर्ग यांचा सुंदर मिलाफ त्यांनी या चित्रातून साधला असून, याच मालिकेतील चित्राची निवड या राष्ट्रीय प्रदर्शनासाठी झाली आहे.
सह्याद्री शिक्षणसंस्थेचे कार्याध्यक्ष शेखर निकम, सचिव महेश महाडिक, ज्येष्ठ चित्रकार-शिल्पकार प्रा. प्रकाश अर्जुन राजेशिर्के, पूजा निकम, अनिरुद्ध निकम, महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
---
कोट
निसर्गातील अदृश्य दैवीशक्ती चित्रांच्या माध्यमातून मांडण्याचा माझा हा प्रयत्न आहे. बॉम्बे आर्ट सोसायटीसारख्या प्रतिष्ठित मंचावर या चित्राची निवड होणे, ही माझ्यासाठी आणि आमच्या सह्याद्री कला महाविद्यालयासाठी आनंदाची गोष्ट आहे.
- प्रा. विक्रांत बोथरे, चित्रकार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.