-rat३०p१५.jpg -
P२६O२०८५५
चिपळूण ः गीत सादरीकरणात सहभागी झालेल्या विद्यार्थ्याला गौरवताना आनंद माडगुळकर.
---
विद्यार्थ्यांनी घेतला ‘आनंदमय कोशाचा’ अनुभव
चिपळूणच्या युनायटेड गुरुकुलमध्ये ‘अथ श्रीरामायण’ कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ३० ः आषाढी एकादशी, गणेशोत्सव अशा कार्यक्रमांसोबतच सामाजिक जागृतीचे कार्यक्रम, स्पर्धा इत्यादींमध्ये नियमितपणे मुलं सहभागी होत असतात. युनायटेड गुरुकुलच्या विद्यार्थ्यांना एका सामाजिक उद्देशाने, सांस्कृतिक भावनेने झालेल्या कार्यक्रमात सहभागाची आगळीवेगळी संधी मिळाली.
चिपळूण मधील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात गुरूकुलमधील ३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रवेशद्वारावर आकर्षक रांगोळी काढणे, प्रेक्षकांचे गंध लावून स्वागत करणे, संयोजकांच्या सूचनेनुसार पेढ्यांचे आणि तिळगुळाचे वाटप करणे, अशा आवश्यक त्या छोट्या-मोठ्या सहकार्यासोबतच प्रत्यक्ष रंगमंचीय कार्यक्रमात दोन्ही दिवस अनुक्रमे जय गंगे जय भागीरथी आणि सेतू बांधारे सागरी ही रामायणातील दोन प्रसिद्ध गीते अत्यंत उत्तमप्रकारे सामूहिक गायन स्वरूपात सादरीकरण करणे, अशा विविध प्रकारच्या सहभागाने खऱ्या अर्थाने आनंदमय कोश विद्यार्थ्यांनी अनुभवला.
प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण अशी मूलभूत संकल्पना असणाऱ्या गुरूकुलमध्ये विद्यार्थ्यांनी या अथ श्रीरामायण या कार्यक्रमाच्या निमित्ताने गाण्यांच्या पूर्वतयारीपासून प्रत्यक्ष कार्यक्रम होईपर्यंतच्या जवळपास दीड महिन्याच्या कालावधीत पुष्कळ छोटी-मोठे कौशल्य नकळत अनुभवाने समजून घेतली. अभ्यासासाठी शंभर टक्के प्रयत्न करत, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता जपत विविध उपक्रमांच्या आधारे अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय अशा पाच कोशांच्या माध्यमातून वर्षभर अनेक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी गुरुकुलामध्ये नियमित होत असतात आणि विद्यार्थी यामधून अनुभव समृद्ध होत असतात.
----
चौकट
आनंद माडगूळकरांची उपस्थिती प्रेरणादायी
महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांचे पुत्र आनंद माडगूळकर यांची या कार्यक्रमाला उपस्थिती हा गुरुकुलच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत भाग्याचा क्षण. गीत सादरीकरणात सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांना आनंद माडगूळकर यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. हा सर्व विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला अत्यंत संस्मरणीय क्षण गुरुकुलच्या गीतमंचातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.