कोकण

धोकादायक फिडरकडे दुर्लक्ष का? ः सूर्याजी

CD

20868

धोकादायक फिडरकडे
दुर्लक्ष का? ः सूर्याजी

महावितरणला घेराओ घालण्याचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३० ः येथील बाजारपेठेतील संचयनी पॅलेसच्या मागील बाजूस असलेला महावितरणचा फिडर पिलर उघडा पडला असून, महावितरणचे त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे नागरिक, लहान मुलांच्या जीवीतास धोका निर्माण झाला आहे. शहरात वस्तीच्या ठिकाणी असेच प्रकार दिसून येतात. त्यामुळे चार दिवसांत महावितरणने ही परिस्थिती बदलावी अन्यथा, महावितरण अधिकाऱ्यांना घेराओ घालू, असा इशारा युवा रक्तदाता संघटना अध्यक्ष, नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी दिला आहे.
श्री. सूर्याजी म्हणाले, ‘महावितरणचे बाजारपेठेतील भागाकडे देखील लक्ष नाही. संचयनी पॅलेसच्या येथे नागरिक राहतात, लहान मुलं खेळतात. इथला फिडर पिलर उघडा असून, धोकादायक झाला आहे. यामुळे जीवितास धोका निर्माण झाला आहे. ही परिस्थिती बघता जीव गेल्यानंतर महावितरण प्रशासनाला जाग येणार का, असा प्रश्‍न त्यांनी केला, तर एकीकडे पालकमंत्री नीतेश राणे व आमदार दीपक केसरकर यांच्याकडे मागणी केल्यानंतर निधी उपलब्ध करून देतात. मात्र, मुजोर अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. कादरी प्रार्थनास्थळ येथील स्ट्रीट लाईटचा बॉक्सही अनेक महिने उघडा पडला होता. इशारा दिल्यानंतर तो बदलला.‌ त्यामुळे शहरात वस्तीच्या ठिकाणी असलेले उघडे असणारे ट्रान्स्फॉर्मर, फिडर पिलर चार दिवसांत न बदलल्यास महावितरण अधिकाऱ्यांना घेराओ घालू.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईचा 'हा' फलंदाज ठोठावतोय टीम इंडियाचे दार! रणजी करंडक स्पर्धेत ७०० हून अधिक धावा; दिल्लीच्या गोलंदाजांची निघाली हवा

Sangli ZP : जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीसाठी वाळव्यात तांत्रिक व सुरक्षा तयारी पूर्ण

Sunil Tatkare: ''पवार कुटुंबाशी बोलणं आमच्यासाठी अवघड'', मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सुनील तटकरेंचा माध्यमांशी संवाद, उद्या आमदारांची बैठक

Mumbai: मालाड प्रकरणानंतर प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये! लोकलमधील प्रवाशांवर नजर ठेवणार, ट्रेनमध्ये तब्बल १२ हजार सीसीटीव्ही बसवणार

"त्यावेळी मी माझं दुसरं बाळ गमावलं..." राणी मुखर्जीचा गर्भपाताबद्दल खुलासा "7 वर्षांनंतर आई होणार होते"

SCROLL FOR NEXT