ratchl३०१.jpg -
P26O21034
चिपळूण ः कोकण स्टार्टअप् चॅलेंजमध्ये यश मिळवणारे सावर्डेतील फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी व शिक्षक.
----
सावर्डे फार्मसीचे स्टार्टअपमध्ये यश
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. 31 ः नवप्रबोधन इनक्युबेशन सेंटर, सीआयआरईई - स्टार्टअप् आणि इनक्युबेशन सर्व्हिसेस यांनी देवरूख येथे नुकतेच कोकण स्टार्टअप् चॅलेंज २०२६चे आयोजन केले होते. राज्यभरातील चांगल्या स्टार्टअप्सना ओळखून त्यांची उन्नती करण्यासाठी या स्पर्धेची रचना केली होती. या स्पर्धेत तालुक्यातील सावर्डे येथील गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाच्या ‘ड्युअल सीझन स्मार्ट हॅट’ यांसह तीन प्रकल्पांनी बाजी मारली.
समाजासाठी उपयोगी आणि फलदायी ठरणाऱ्या नवीन उपक्रम व प्रकल्पाला चालना मिळावी, त्यांना इनक्युबेशन समर्थन, मार्गदर्शन, बाजारपेठ प्रवेश आणि सरकारी निधीबाबत मार्गदर्शन करून त्यांचा विकास साधण्याच्या हेतूने या स्पर्धेचे आयोजन केले. कोकण स्टार्टअपमध्ये चॅलेंज प्रथम ५ स्टार्टअप्सना ‘बेस्ट इमर्जिंग स्टार्टअप्’ हा किताब आणि पुढील इनक्युबेशनची संधी देऊन सन्मानित करण्यात आले. सावर्डे येथील गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्रा. डॉ. ललिता नेमाडे व प्रा. प्रणाली दळवी यांनी ‘ड्युअल सीझन स्मार्ट हॅट’ ही हॅट अत्यंत उष्ण आणि अत्यंत थंड हवामानात शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठीचा प्रकल्प सादर केला. यातून हायपोथर्मिया आणि उष्माघात यामुळे होणारे मृत्यू टाळता येतील. यामध्ये वापरण्यात येणारे हॉटपॅक तसेच कोल्डपॅक आपण दैनंदिन दुखापतीसाठीसुद्धा वापरू शकतो. ही हॅट वारंवार वापरता येणारी, विजेचा उपयोग न करता परवडणाऱ्या किमतीमध्ये मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न आहे, ज्यामुळे ती सर्वांसाठी अत्यंत उपयोगी ठरू शकते.
दुसऱ्या ‘अझोलाट्रिनिटी’ या प्रोजेक्टमध्ये विद्याथ्यांनी प्रा. अपेक्षा साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली अझोला या शेवाळीपासून कुक्कुटपालन व्यवसायात खाद्य बनवणे तसेच डासप्रतिबंधक म्हणून वापर करू शकतो, असे सांगितले. तिसऱ्या ‘फायटोप्लास्ट’ प्रकल्पामध्ये विद्यार्थ्यांनी प्रा. सुकन्या पाटील व प्रा.आदित्य गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली शेतीच्या कचऱ्याचा वापर करून शाश्वत बायोप्लास्टिक तयार करण्यावर भर दिला. स्पर्धेत या तिन्ही प्रकल्पांची निवड करण्यात आली. या यशाबद्दल सहभागी विद्यार्थी आणि शिक्षकांचे संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य आदींनी कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.