कोकण

तळवणे संजीवन मठात आजपासून भंडारा उत्सव

CD

तळवणे संजीवन मठात
आजपासून भंडारा उत्सव

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३१ ः सद्‌गुरू परशुराम महाराज संजीवन समाधी मठ, तळवणे येथे १ ते ६ फेब्रुवारीपर्यंत भंडारा उत्सवाचे आयोजन केले आहे. यानिमित्त दशावतार नाट्यप्रयोगांसह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजकांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
प्रसिद्धी पत्रकात नमूद होणारे कार्यक्रम असे ः उद्या (ता. १) सकाळी ८ वाजता धार्मिक विधी, आरती, तीर्थप्रसाद, २ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता श्री देव गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, किर्लोस मालवण यांची वारकरी दिंडी, रात्री ९ वाजता ‘मी राखणदार’, १० वाजता पालखी सोहळा, ११ वाजता पावणी लिलाव, ११.३० वाजता आरोलकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होईल.
२ रोजी ८ वाजता धार्मिक विधी प्रारंभ, १ वाजता नैवेद्य, आरती, तीर्थप्रसाद, दुपारी १.३० पासून महाप्रसाद, सायंकाळी सातला भजने, रात्री दहाला श्री सतीदेवी मित्रमंडळ तळवणे वेळवेवाडी यांचे नाटक ‘दिवाळी’, ३ ला सकाळी ८ वाजता धार्मिक विधी प्रारंभ, १ वाजता नैवेद्य, आरती, तीर्थप्रसाद, दीडला फुगडी, सायंकाळी साडेसहाला भारतीस्वामीगाथा संगीतसंध्या, रात्री दहाला खानोलकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग, ४ ला सायंकाळी ८ वाजता धार्मिक विधी प्रारंभ, दुपारी १ वाजता नैवेद्य, आरती, तीर्थप्रसाद, १ ते ४ पर्यंत महाप्रसाद, ५ वाजता भाऊ नाईक (वेतोरे) यांचे कीर्तन, रात्री १० वाजता श्री देवी माऊली कला, क्रीडा मंडळ, तळवणेतर्फे जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ यांचे ‘दख्खनचा राजा ज्योतिबा माझा’ ट्रिकसीन नाटक, ५ ला सकाळी ८ वाजता धार्मिक विधी व गणेश याग, दुपारी १ वाजता आरती, देवता प्रार्थना, आशीर्वाद ग्रहण, तीर्थप्रसाद, १.३० ते ४ पर्यंत महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता भजने, रात्री ९.३० वाजता गुरुकृपा नाट्यमंडळ, तळवणे-मठवाडी यांचा नाट्यप्रयोग ‘धुमशान’, ६ रोजी सकाळी ८ वाजता महापुरुष व गणपती यांची नित्यपूजा व अभिषेक, दुपारी १२ वाजता आरती, नैवेद्य, सायंकाळी ४ वाजता गणपती मूर्तीचे विसर्जन होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन राजेंद्र स्वामी भारती महाराज, मठवाडी व ग्रामस्थांनी केले आहे.

Sunetra Ajit Pawar: अर्थ खातं फडणवीसांकडेच! सुनेत्रा पवारांकडे 'या' खात्यांची जबाबदारी

Thane: हाजीमलंग यात्रेसाठी पोलिसांचा अलर्ट! 'या' वेळेत मलंगगडावर जाण्यास बंदी, रोप-वेसह वाहतुकीची विशेष नियमावली जारी

Budget 2026 : क्रिप्‍टो कर आकारणीबाबत पुनर्विचार करण्‍याची गरज! बजेट 2026 मध्ये त्‍यासंदर्भात बदल करणे आवश्‍यक

U19 World Cup: भारताविरुद्ध जिंका, नाहीतर गाशा गुंडाळा, पाकिस्तानसमोर 'करो वा मरो'ची परिस्थिती; जाणून घ्या समीकरण

Bank Merger: सर्वात मोठा बँकिंग निर्णय! सार्वजनिक क्षेत्रातील 'या' दोन बँकांचे महाविलीनीकरण होणार; इतिहासात नवा अध्याय

SCROLL FOR NEXT