कोकण

तालुक्याचा सर्वांगीण विकास हे माझे कर्तव्य

CD

- rat१p१०.jpg-
२६O२११८२
पंदेरी : सुतारवाडी येथे आयोजित विश्वकर्मा जयंती कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना गृहराज्यमंत्री योगेश कदम.
----
सर्वांगीण विकास हे माझे कर्तव्य
योगेश कदम ः विश्वकर्मा जयंतीनिमित्त पंदेरी सुतारवाडीत कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १ ः सुमारे पन्नास वर्षांनंतर मंडणगड तालुक्याला मंत्रिपद मिळाले असून, या संधीचा उपयोग करून तालुक्याचा सर्वांगीण आणि व्यापक विकास करणे हे लोकप्रतिनिधी म्हणून माझे प्रथम कर्तव्य आहे, असे प्रतिपादन भगवान विश्वकर्मा जयंतीनिमित्त पंदेरी सुतारवाडी येथे आयोजित कार्यक्रमात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंत्री कदम यांच्या हस्ते भगवान विश्वकर्मा यांचे पूजन करण्यात आले. यानंतर आयोजित स्वागत व सत्कार समारंभात उपस्थितांना विश्वकर्मा जयंतीच्या शुभेच्छा देताना ते म्हणाले की, शासनाच्या माध्यमातून तालुक्यातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर आमचा भर आहे. विशेषतः सिंचन, कृषी आणि रोजगारनिर्मिती या मूलभूत विषयांना प्राधान्य देत, सर्वांना सोबत घेऊन विकासकामे राबवली जात आहेत. या कार्यक्रमाला माजी सभापती आदेश केणे, अनंत लाखण, रामदास रेवाळे, नितीन म्हामुणकर, अस्मिता केंद्रे, प्रणाली चिले, संदेश चिले, सुजित देवकर यांच्यासह पंदेरी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन पंदेरी सुतारवाडी येथील ग्रामस्थांनी अत्यंत उत्साहात केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! India vs Pakistan सामना १५ फेब्रुवारीलाच होणार; मोहसिन नक्वी यांचा खोटारडेपणा उघड

Ajitdada Pawar : बारामती खरेदी-विक्री संघाचे ऐतिहासिक पाऊल; आता 'अजितदादा पवार' नावाने ओळखली जाणार संस्था, संचालक मंडळाचा मोठा निर्णय

Hasan Mushrif : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाबाबत हसन मुश्रीफ स्पष्टच म्हणाले...

IIT Bombay Research : रेशीमकिडे न मारता मिळणार रेशीम! IIT बॉम्बेचा 'जीवोदय' प्रकल्प यशस्वी; कोल इंडियाच्या पाठिंब्याने प्रयोग, वाचा सविस्तर

Sensex Today : अवघ्या 20 मिनिटांत शेअर बाजारात 20 लाख कोटींचा नफा! गुंतवणूकदार मालामाल, ऐतिहासिक वाढीमागची ही '3' मोठी कारणं

SCROLL FOR NEXT