नवनिर्माणमध्ये ६ला ‘स्ट्रीट फूड’ मेळा
हॉस्पिटॅलिटी विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष अनुभव उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १ ः येथील नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील हॉस्पिटॅलिटी स्टडीज विभागाच्यावतीने ६ फेब्रुवारी रोजी ‘द फ्लेवर ऑफ स्ट्रीट’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यावसायिक अनुभव आणि व्यवस्थापन कौशल्यांचे धडे मिळावे, या उद्देशाने हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे.
नवनिर्माण महाविद्यालयाच्या या कार्यक्रमासाठी चिपळूण नगरपालिकेचे बांधकाम स्थायी समिती अध्यक्ष मा. कपिल शिर्के, संगमेश्वर येथील ज्येष्ठ उद्योजिका मनीषा रहाटे आणि श्रुती कापडी हे उपस्थित राहणार आहेत. या उपक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे, याचे संपूर्ण नियोजन तृतीय वर्ष बी.एस्सी. हॉस्पिटॅलिटी स्टडीजच्या विद्यार्थ्यांनी केले आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संजना चव्हाण आणि विभागप्रमुख प्रा. भिकाजीराव बेहरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडत आहे. या ‘फूड फेस्ट’मध्ये विविध प्रकारचे चविष्ट ''स्ट्रीट फूड'' सादर केले जाणार असून त्याचे आकर्षक स्टॉल्स लावले जातील. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी स्थानिक नागरिक आणि खाद्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.