‘ती’चा भवताल ----------लोगो
(२० जानेवारी टुडे ८)
सौंदर्य उपचारांत केमिकल
ट्रीटमेंट्सची भीती नको
आजच्या आधुनिक जीवनशैलीत सौंदर्य म्हणजे केवळ बाह्यआकर्षण नसून, स्वतःची नीट काळजी घेण्याची जाणीव आहे. केस व त्वचा यांची निगा राखण्यासाठी पार्लरमध्ये दिल्या जाणाऱ्या विविध उपचारांकडे लोकांचा ओढा वाढलेला दिसतो; मात्र या ट्रीटमेंट्सबाबत अनेक गैरसमज आजही समाजात पसरलेले आहेत, विशेषतः केमिकल हेअर ट्रीटमेंट्सबाबत. केमिकल ट्रीटमेंट म्हणजे लगेच नुकसानच होते, असा समज चुकीचा आहे. कोणतेही उपचार ही केसांच्या प्रकारानुसार, योग्य सल्ल्याने आणि योग्य पद्धतीने केली तर ती केसांसाठी फायदेशीर ठरू शकते. समस्या उपचारामध्ये नसून, चुकीच्या माहितीमध्ये आणि घरगुती प्रयोगांमध्ये अधिक असते.
- rat2p9.jpg-
P26O21505
- मेधा कुळकर्णी, आर्या ब्युटीकेअर
---
बहुतेक लोकांचा एक ठाम समज असा आहे की, ‘मेहंदी ही पूर्णपणे नैसर्गिक आणि चांगली तर हेअरकलर म्हणजे केमिकल आणि त्यामुळे केस खराब होतात;’ पण वास्तव हे थोडे वेगळे आहे. बाजारात मिळणारी बहुतांश मेहंदी ही शुद्ध नसते. तिच्यात रंग टिकवण्यासाठी आणि गडद करण्यासाठी मेटलिक सॉल्ट्स, वूड एन्झाइम्स यांचा वापर केलेला असतो. हे घटक केसांवर दीर्घकाळ वापरले गेले तर केस कोरडे, रूक्ष होणे, तुटणे आणि नैसर्गिक शाईन कमी होणे असे दुष्परिणाम दिसून येतात. याच्या उलट, आजच्या घडीला वापरले जाणारे क्रीमबेस्ड, कंडिशनरयुक्त हेअरकलर्स हे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असतात. या रंगांमध्ये अमोनियाचे प्रमाण कमी असते किंवा अमोनियाफ्री पर्याय उपलब्ध असतात. त्यात मिसळलेले कंडिशनर्स केसांच्या क्युटिकल लेयरला बंद करण्यास मदत करतात त्यामुळे केसांमध्ये शाईन, लस्टर आणि स्मुथनेस टिकून राहतो.
इथे मला कळकळीची विनंती करावी वाटते की, वेगवेगळ्या जाहिराती बघून त्याला भुलतो. आपण चुकीच्या पद्धतीने काही प्रॉडक्ट्स वापरतो की, जी प्रॉडक्ट आपल्याला सूट होणारे नसतात. अशाने नक्कीच दुष्परिणाम आपल्या केसांवर किंवा स्किनवर होऊ शकतो. यासाठीच तुम्हाला योग्य हुशार आणि तज्ज्ञ हेअरड्रेसरचीच मदत घेणे आवश्यक असते. इथे मी तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छिते की, एखादा अॅक्सिडंट झालाय आणि तिथे जर आपल्याला स्टीचेस घालायची वेळ आली किंवा टाके घालायची वेळ आली तर आपण जसं हॉस्पिटलची मदत घेऊन तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच तिथे टाके घालतो. आपण आपल्या घरामध्ये असलेल्या सुईदोऱ्याने ते घालू शकत नाही. हाच प्रकार केसांच्या ट्रीटमेंटबद्दल किंवा त्यात वापरण्यात येणाऱ्या प्रॉडक्ट्सबद्दल हे उदाहरण तंतोतंत जुळवून घेऊ शकतो. म्हणजेच या क्षेत्रातील निष्णात व्यक्तींच्या मार्गदर्शनाखालीच आपण या ट्रीटमेंट कराव्यात, अशी मी कळकळीची विनंती तुम्हाला करते.
तसेच, सलूनमध्ये दिल्या जाणाऱ्या हेअरस्पा, डीप कंडिशनिंग, स्कॅल्प ट्रीटमेंट्स या सुद्धा केमिकल प्रक्रियेचाच भाग आहेत; पण त्या केसांना पोषण देण्यासाठीच डिझाईन केल्या जातात. त्यामुळे ‘केमिकल’ हा शब्द नकारात्मक न पाहता त्यामागील गुणवत्ता, प्रमाण आणि तज्ज्ञांचा अनुभव महत्त्वाचा ठरतो.
सौंदर्यउपचार करताना केवळ ऐकीव माहितीवर विश्वास न ठेवता अनुभवी ब्युटिशियनचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य मार्गदर्शन घेतले तर केमिकल ट्रीटमेंट्स केसांचे सौंदर्य वाढवण्याचे काम नक्कीच करू शकतात. अजून एक महत्त्वाचा मुद्दा की, बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की, ब्युटीपार्लरचा धंदा वाढावा म्हणून हेअरड्रेसर तुम्ही घरी कुठले उपाय करू नका, असे सांगतात; पण इथे पण एक तुम्हाला सांगावंस वाटतं की, शेवटी प्रोफेशनल गोष्टी या तज्ज्ञ व्यक्तींच्या सल्ल्यानेच केल्यानंतर त्याचा योग्य तो परिणाम आपल्याला दिसून येतो; पण प्रत्येकाच्या घरात वापरण्यात येणारे प्रॉडक्ट्स किंवा त्यातील घटक हे चांगल्या दर्जाचे असतीलच, असे नाही. त्याचा काहीतरी दुष्परिणाम होऊन डॉक्टरला पैसे घालण्यापेक्षा एकदाच आपण तज्ज्ञ व्यक्तींच्या सल्ल्याने गेलो तर आपल्याला होणाऱ्या त्रासातून आपण वाचू शकतो.
(लेखिका ब्युटी थेरपिस्ट हेअरड्रेसर अरोमा थेरपिस, CIDESCO (zurich) PHD आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.