कोकण

शंका दूर करूनच प्रकल्प

CD

- rat१p२८.jpg-
P२६O२१३८५
वाटद जिल्हा परिषद गटातील सभेत मार्गदर्शन करताना उदय सामंत.

शेतकऱ्यांच्या शंका दूर करूनच
वाटद एमआयडीसी ः उदय सामंत
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय आणि त्यांना विश्वासात न घेता कोणताही औद्योगिक प्रकल्प लादला जाणार नाही. स्थानिक शेतकऱ्यांच्या शंका दूर करून, त्यांना योग्य मोबदला मिळाल्याशिवाय वाटद येथे एमआयडीसी होणार नाही. विरोधक केवळ संभ्रम निर्माण करण्याचे काम करत आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
वाटद जिल्हा परिषद गटातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. रत्नागिरी नगरपालिकेच्या निवडणुकीत ३२ पैकी २९ जागा जिंकून महायुतीने विरोधकांना स्पष्ट पराभव दिला होता. हाच कौल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही दिसून येईल. जिल्हा परिषदेवर महायुतीचाच अध्यक्ष बसेल आणि विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नसून, जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत तोपर्यंत ही योजना सुरूच राहील, असे त्यांनी ठणकावून सांगितले. महिलांना केवळ १५०० रुपये देऊन थांबणार नाही, तर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून ३५ टक्के अनुदानावर अर्थसाहाय्य देऊन त्यांना लखपती बनवण्याचा सरकारचा निर्धार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींची फी माफ करण्याचा निर्णय केवळ महायुती सरकारनेच घेतल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. जातीपातीचे राजकारण न करता सर्वांना सोबत घेऊन विकास साधण्याचे काम महायुतीने केल्याचे त्यांनी सांगितले.
या सभेला बाबू पाटील, विवेक सुर्वे यांच्यासह सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक, प्रकाश साळवी, राजेश मोरे, जिल्हा परिषद उमेदवार अनुष्का खेडेकर, हर्षदा गावडे, संजय दत्त माने यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Urdu Schools Timing: उर्दू शाळांच्या वेळा बदलणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय, कारण काय? जाणून घ्या...

मी सांगत होते मला कपडे बदलू द्या... घराबाहेर येताच सोनालीने केली पोलखोल; म्हणते- चौथ्या दिवशीच बटवर इन्फेक्शन...

तेव्हा त्याचे काही प्रॉब्लेम नव्हते... मराठी अभिनेत्रीने सांगितला मंदार देवस्थळीसोबतचा अनुभव; झी मराठीवरच केलेली मालिका

Ajit Pawar: कात्रज दूध संघाला ‘अजित पवार’ यांचं नाव देण्याचा निर्णय; 'असं' असेल पूर्ण नाव

Latest Marathi News Live Update: वाशिममध्ये वीटभट्टी जवळील विहरीत पडून तीन वर्षीय मुलीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT