swt217.jpg
21646
दारुम ः पावणाई देवी मंदिर वर्धापन दिन सोहळ्यास उपस्थित भाविक.
दारुम पावणाई मंदिर
वर्धापन दिन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २ : दारुम गावची ग्रामदेवता पावणाई देवी मंदिर नूतनीकरण प्रथम वर्धापन दिन सोहळा भाविकांच्या अलोट गर्दीत मोठ्या उत्साहात झाला. यानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी ८ वाजल्यापासून विविध धार्मिक विधी, तीर्थप्रसाद, दुपारी महाप्रसाद, हळदी-कुंकू समारंभ, सायंकाळी देणगीदार व पदाधिकाऱ्यांचा सत्कार, रात्री गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ तळेरे बुवा संतोष तळेकर, सोनाळी तळेकर ग्रामस्थ, आनंद युवा संघ मुंबई बुवा नंदादीप वंजारे यांची सुस्वर भजने झाली.
या कार्यक्रमादरम्यान भैराई देवी मोंडपार यांचे जोरदार ढोलवादन करण्यात आले. मंदिर नूतनीकरण समिती अध्यक्ष प्रवीण तळेकर यांनी आभार मानले. खजिनदार रवींद्रनाथ तळेकर यांनी मनोगत व्यक्त केले. देवस्थान समिती अध्यक्ष अशोक तळेकर, नूतनीकरण समिती उपाध्यक्ष संतोष तळेकर, कार्याध्यक्ष प्रमोद तळेकर, मुंबई मंडळ अध्यक्ष मनोहर तळेकर, पदाधिकारी राजेंद्र तळेकर, मनीष तळेकर, राजेंद्र तावडे, विनायक मोहिते आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.