फिजिओ संवाद ..........लोगो
(२८ जानेवारी टुडे ३)
फिजिओथेरपी हा शेवटचा
नव्हे पहिला उपाय
फिजिओथेरपीच्यादृष्टीने पाहिलं तर ज्या वेळी वेदना सुरू होते त्या वेळेपासून लवकरात लवकर फिजिओथेरपी उपचार सुरू करणे गरजेचे असते. उदाहरणार्थ- आपण सर्वजण क्रिकेट पाहत असालंच. एखादा खेळाडू खेळताना दुखापतग्रस्त झाला तर त्याच्याकडे धावत येणारा पहिला तज्ज्ञ हा फिजिओथेरपिस्ट असतो. म्हणूनच फिजिओथेरपी हा शेवटचा उपाय नसून पहिला उपाय आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे.
- rat३p२.jpg-
P26O21739
- डॉ. पुष्कराज चांदोरकर
(PT)B.P.Th.
--------
‘दुखायला सुरुवात होऊन सहा महिने झाले. सुरुवातीला बारीक बरीक दुखत होतं; पण आता असह्य झालं आहे,’ हे वाक्य नेहमीच पेशंटकडून ऐकू येतं. दुखणं अंगावर काढणे ही सवय आपल्याकडे फार प्रमाणात आहे. मी दुखणं सहन करू शकतो. ही माझी ताकद आहे, असे बरेचजण मानतात; पण प्रत्यक्षात मात्र ते शरीराकडे केलेलं दुर्लक्ष असतं. वेदना म्हणजे कमजोरीचे चिन्ह नसून, शरीराने दिलेला एक इशारा असतो.
एखादी वस्तू उचलताना अचानक पाठीत चमक भरते किंवा सकाळी झोपून उठल्यावर मान दुखायला लागते. एखादी वस्तू फेकल्यामुळे किंवा खेचल्यामुळे खांदा लचकतो आणि अशा बऱ्याच प्रकारच्या किरकोळ दुखापती सतत घडत असतात. अशी दुखापत झाल्यानंतर ती व्यक्ती पहिले दोन-तीन दिवस काहीच उपचार करत नाही किंवा घरगुती उपचार करून बघतात. वेदना थोडी कमी वाटली तर त्याकडे लगेच दुर्लक्ष करून पुन्हा त्या अवयवाला त्रास द्यायला सुरुवात करतात. जर वेदना कमी झाली नाही तर पेनकिलर किंवा मसल रिलॅक्संट या गोळ्या घेतात. पेनकिलर स्प्रे मारतात, पॅचेस लावतात, थोडक्यात सगळं करतात; पण फिजिओथेरपी उपचार विचारात घेत नाहीत. मग ते दुखणं त्याच्या मुळावर काम न केल्यामुळे पूर्णपणे जात नाही. पुढे जाऊन त्या सांध्यांची हालचाल कमी होते. स्नायू आखडतात, Posture बदलते, माणूस दुखण्याशी जुळवून घेऊन जगायला सुरुवात करतो. म्हणजेच दुखणे अंगावर काढणे, ही सवय होऊन जाते. एवढे दुखत असूनही सगळं सहन करून मी काम करतो, ही वाक्यं अभिमानाने सांगितली जातात. पेनकिलरवर अवलंबून राहण्याची प्रक्रिया वाढू लागते. हळूहळू समस्या अधिक गुंतागुंतीची होत जाते.
मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, हातपायातील मुंग्या ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे शरीराचे इशारे असतात. या इशारांकडे दुर्लक्ष न करता ते इशारे वेळेवर समजून घेऊन त्यावर फिजिओथेरपी उपचार करणे गरजेचे आहे. शरीर आपल्याशी सतत संवाद साधत असते. फक्त आपण तो संवाद ऐकायला शिकलं पाहिजे.
यामध्ये वेदनेचं मूळ शोधणे, दुखापत झालेला स्नायू किंवा भाग शोधणे, त्याला योग्य तो उपचार करून त्याच्यावरचा भार कमी करणे. आहार, झोप आणि पोस्चरच्या सवयी बदलणे इत्यादी गोष्टींमधून फिजिओथेरपिस्ट तुम्हाला मदत करू शकतो.
कोणीतरी सांगितलेले उपाय करणे, दुखण्याबद्दल चिंता करत बसणे, दुखणाऱ्या भागाची हालचाल पूर्णपणे बंद करणे, आज नको उद्या बघू, असा विचार करणे, पेनकिलरवर अवलंबून राहणे या चुका लोकांनी टाळल्या पाहिजेत. याउलट वेदना कशी सुरू झाली, कोणत्या गोष्टींमुळे वेदना वाढते आहे, कोणत्या गोष्टींमुळे वेदना कमी होते आहे, कोणत्या वेळी वेदना सर्वाधिक असते या गोष्टींकडे लक्ष देऊन ते फिजिओथेरपिस्टना वेळेत सांगितल्यास वेदनेचे मूळ शोधणे आणि त्यावर उपाय करणे सोपे जाते.
वेदना सहन करणे ही ताकद नसून, शरीराकडे केलेलं दुर्लक्ष आहे. शरीराचे वेळेवर ऐकले आणि योग्यवेळी फिजिओथेरपी उपचार केले तर वेदना वाढण्यापूर्वीच थांबवता येऊ शकते.
(लेखक लांजा येथे अनादि फिजिओथेरपी क्लिनिक चालवतात.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.