मार्कर पेन नव्हे; न मिटणारी शाई!
निवडणूक नियोजन; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ३ ः ‘‘सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदारांना चिठ्ठी मिळाली आहे की नाही?, याची खात्री करून मार्क कॉपी नियमानुसार तयार करावी,’’ असे आदेश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणेला दिले आहेत. या निवडणुकीमध्ये मार्कर पेनऐवजी पारंपरिक पद्धतीने न मिटणारी शाई बोटांना लावण्यात येणार आहे. यासाठी प्रति मतदान केंद्र तीन इंक बॉटलचे वितरण केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी शनिवारी (ता. ७) मतदान, तर सोमवारी (९) मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान, मतमोजणी व कायदा-सुव्यवस्थेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (२) आढावा बैठक झाली. या बैठकीत निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर काटेकोर नियोजन व अंमलबजावणीबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, तसेच सर्व निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी दुबार मतदारांबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या २९ ऑक्टोबर २०२५ च्या पत्रानुसार आवश्यक कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले. मतदार चिठ्ठी वाटपाबाबत सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदारांना चिठ्ठी मिळाली आहे की नाही, याची खात्री करून नियमानुसार मार्क कॉपी तयार करावी. मतदान साहित्य वेळेत व योग्य प्रमाणात वितरित झाले आहे का, याची खात्री करण्यावर भर द्यावा. अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करावे. ईव्हीएम मशीन तपासणी, ‘एंड’ (ईएनडी) बटन बंद करण्याच्या सूचना, मतदानादिवशी सर्व केंद्रांवर मतदान सुरू होण्यापूर्वी सकाळी ६.३० वाजता मॉकपोल (अभिरूप मतदान) घेण्यात येणार आहे.
या निवडणुकीमध्ये मार्कर पेनऐवजी पारंपरिक पद्धतीने न मिटणारी शाई बोटांना लावण्यात येणार आहे. प्रति मतदान केंद्र तीन इंक बॉटलचे वितरण, तसेच कायदा-सुव्यवस्थेसाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना कार्यकारी दंडाधिकाऱ्यांचे अधिकार प्रदान करण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. प्रतिबंधात्मक कार्यवाहीची पडताळणी करणे, मतदानानंतर नोंदविलेल्या मतांचा हिशेब ठेवण्यासाठी व्ही.एम.-३ नमुन्याबाबत मार्गदर्शन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
.....................
आपत्कालीन सुविधांसह कडक बंदोबस्त
मतमोजणीच्या पूर्वतयारीचा आढावा घेताना प्रशिक्षण पूर्ण करणे, आवश्यक फॉरमॅट व अहवाल नमुने तयार ठेवणे, टपाली मतपत्रिकांच्या मोजणीची तयारी, निकाल प्रसिद्धीसाठी डिस्प्ले फलकाची व्यवस्था, मतमोजणी केंद्राची सुरक्षितता व प्रवेश नियंत्रणाचे सविस्तर नियोजन झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले. मतमोजणी कर्मचारी व पर्यवेक्षकांची नियुक्ती करून त्यांना आवश्यक प्रशिक्षण दिले असून सीसीटीव्ही, वीजपुरवठा व आपत्कालीन सुविधा उपलब्ध असल्याची खात्री केली आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.