कोकण

मॅरेथॉन स्पर्धेवर सार्थक, निर्वी, दक्ष, आरोहीचे वर्चस्व

CD

- rat3p7.jpg-
26O21774
सावर्डे ः बक्षीस वितरण करताना राजन कापडी, राजेंद्र कदम, सदानंद सुर्वे, संतोष सुर्वे, संजय साळवी आदी.

मॅरेथॉनमध्ये सार्थक, निर्वी, दक्ष, आरोहीचे वर्चस्व
कुंभारखाणी ग्रामोत्कर्ष संघतर्फे आयोजन ; २५८ स्पर्धकांचा सहभाग
सकाळ वृत्तेसवा
सावर्डे, ता. ३ : मौजे कुंभारखाणी बु. ग्रामोत्कर्ष संघ मुंबई, ग्रामपंचायत कुंभारखाणी बुद्रुक, क्रीडा मंडळ (ता. संगमेश्वर) यांच्या संयुक्त विद्यमाने पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित शालेय मॅरेथॉन स्पर्धेत सार्थक गुरव, निर्वी भुवड, दक्ष मेणे, आरोही कुळे, ओम निकम, संस्कृती बाटले, विपुल साळवी, निधी शिगवण यांनी त्यांच्या गटात विजेतेपद पटकावले.
विद्यार्थ्यांमध्ये खेळभावना, आत्मविश्वास, शिस्त, आरोग्यविषयक जागृती निर्माण व्हावी यासाठी ही स्पर्धा माध्यमिक विद्यामंदिर कुंभारखाणी बुद्रुक येथे आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे उद्‍घाटन संघाध्यक्ष संतोष सुर्वे यांच्या हस्ते तर माजी पंचायत समिती सभापती विकास सुर्वे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाले. या प्रसंगी सदानंद सुर्वे, विजय सुर्वे, राजन कापडी, दिलीप सावंत, संजय सुर्वे, स्वप्नील सुर्वे, सचिन सुर्वे, राजेंद्र कदम, कृष्णकांत सुर्वे, संजय साळवी, सरपंच वंदना सुर्वे, दत्ताराम सुर्वे, दिलीप सुर्वे, कल्याणी लाखन, पोलिस पाटील राकेश सुर्वे, तंटामुक्ती अध्यक्ष संजय शिंदे, ग्रामसेवक राहुल चौधरी आदी उपस्थित होते. ही स्पर्धा कुंभारखाणी बुद्रुक राजिवली, कुचांबे, मुरडव, आरवली,असुर्डे, आबंतखोल, नांदगाव, कुटरे ,तळवडे गावातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली होती. स्पर्धेत १५३ मुले व १०५ मुली अशा एकूण २५८ स्पर्धकांनी सहभाग घेतला.
------
चौकट
स्पर्धेचा निकाल असा
आठ ते दहा वर्षे वयोगट (मुले - प्रथम, द्वितीय, तृतीय अनुक्रमे) ः सार्थक गुरव, विहान कदम, सुरज सुर्वे. मुली ः निर्वी भुवड, भूमी शिंदे, आराध्या भुवड. दहा ते बारा वर्षे वयोगट (मुले) ः दक्ष मेणे, श्रेयस खांडेकर, आराध्य लांबे. दहा ते बारा वर्षे वयोगट मुली ः आरोही कुळे, ईशानी भुवड, अन्वी कदम. बारा ते चौदा वर्ष वयोगट मुले ः ओम निकम, रोहन जोशी, साई तांदळे. मुली ः संस्कृती बाटले, आरोही शिर्के, सानवी दरडे. चौदा ते सोळा वर्षे वयोगट मुले ः विपुल साळवी, अनुराज भुवड, प्रथम शिगवण. मुली ः निधी शिगवण, रिया घाणेकर, हस्ता कदम.

T20 World Cup: भारताच्या पहिल्या सामन्यासाठी संजू सॅमसनला संधी, तर इशान किशन, कुलदीप यादव प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर

Lonavala: दुर्गा श्वानामुळे सापडला ४०० फूट खोल दरीतला मृतदेह; ड्रोन तंत्रज्ञानाचीही झाली मोठी मदत

Paschim Maharashtra Temple Recruitment 2026: पश्चिम महाराष्ट्रातील मंदिरांसाठी लवकरच भरली जाणार नवी पदे; बक्कळ पगार अन् मिळणार ही सुविधा

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे बारामती विमान दुर्घटनेतील मृत पिंकी माळीच्या निवासस्थानी दाखल होणार

कोण्या दिग्गज व्यक्तीने नाही तर 'या' माणसाने दादा कोंडकेंना दाखवली पांडू हवालदार सिनेमातील मोठी चूक

SCROLL FOR NEXT