rat३p९.jpg -
२६O२१७७६
सावर्डे : जिल्हास्तरीय सुगम संगीत स्पर्धेतील विजेते स्पर्धक व संयोजक.
सुगम संगीतमध्ये भागडे, भागवत प्रथम
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. ३ : संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथील कै. पांडुरंग सीताराम लघाटे संगीतकक्षातर्फे आयोजित तिसऱ्या जिल्हास्तरीय सुगम संगीत स्पर्धेत मोठा गटात सुहासिनी भागडे तर लहान गटात अनुश्री भागवत यांनी आपल्या सुरांनी बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला.
माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंग्लिश स्कूलमधील गुरुदक्षिणा सभागृहात हा सुरांचा सोहळा रंगला होता. जिल्ह्यातील उदयोन्मुख गायकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
ऑनलाइन पात्रता फेरीतून निवड झालेल्या ५८ स्पर्धकांमधून अंतिम फेरीसाठी लहान गटातून ९ आणि मोठ्या गटातून ६ गायकांची निवड करण्यात आली होती. स्पर्धकांनी सादर केलेल्या गीतांनी उपस्थित रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
रत्नागिरीतील प्रसिद्ध गायक उदय गोखले आणि फाटक हायस्कूलचे उपमुख्याध्यापक आनंद पाटणकर यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. संस्थेचे सचिव श्रीकांत फाटक, सहसचिव दीपक शिगवण, संचालक व स्पर्धाप्रमुख दीपक पोंक्षे यांच्या उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले.
----
चौकट
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
* मोठा गट : सुहासिनी भागडे, इशिता पाटोळे, वेदा वाटवे, गिरीराज लिंगायत.
* लहान गट : अनुश्री भागवत, ऋग्वेद तेरेदेसाई, मुक्ता आंबेकर, सावनी सरपोतदार.