कोकण

वालावल लक्ष्मीनारायण तलाव संवर्धनासाठी जागृती

CD

21818

वालावल लक्ष्मीनारायण तलाव संवर्धनासाठी जागृती

विद्यार्थ्यांचा सहभाग; जागतिक पाणथळ दिनी विविध उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३ ः ‘पाणथळ जागा आणि पारंपरिक ज्ञान; सांस्कृतिक वारसाचा उत्सव’ या जागतिक पाणथळ दिनाच्या थीमनुसार वालावल येथील प्रसिद्ध श्री लक्ष्मीनारायण मंदिराशेजारील तलावाचे संवर्धन व पर्यावरणीय संरक्षण करण्याच्या उद्देशाने लक्ष्मीनारायण मंदिर व परिसरात विविध जनजागृतीपर कार्यक्रम व अभ्यास सत्रांसह सोमवारी (ता. २) पाणथळ दिवस साजरा करण्यात आला.
क. म. शि. प्र. मंडळाचे संत राऊळ महाराज महाविद्यालयातील प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र विभाग, नर्मदाबाई अनंत शिवाजी देसाई विद्यालय वालावल, वनविभाग सावंतवाडी आणि महाराष्ट्र जनक कोष प्रकल्प (विशेष कक्ष) महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने व लक्ष्मीनारायण देवस्थान, तसेच ग्रामपंचायत वालावल यांच्या सहकार्याने लक्ष्मीनारायण मंदिरात पाणथळ दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे होत्या.
व्यासपीठावर वालावल सरपंच राजेश प्रभू, उपसरपंच साक्षी कवठणकर, एन.ए.एस.डी. विद्यालय ट्रस्ट, वालावलचे अध्यक्ष जी. एम. ऊर्फ गोपाळ सामंत, वालावल हायस्कूलचे मुख्याध्यापक नारायण कोठावळे, लक्ष्मीनारायण देवस्थानचे सदस्य संदीप साळसकर, वालावल ग्रामपंचायत पंचायत सदस्य पूर्वा आडेकर, समीक्षा गोवेकर, प्राची हळदणकर, यशश्री वालावलकर, राजू बंगे, माजी सरपंच नीलेश साळसकर आदी उपस्थित होते. लक्ष्मीनारायण तलावाचे महत्त्व, तलावाची स्वच्छता व पर्यावरणीय संरक्षण होण्याच्या उद्देशाने जनजागृतीपर फेरी काढण्यात आली. यामध्ये वालावल हायस्कूल, तसेच कुडाळ महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी ‘फेस पेंटिंग’ करून यात सहभाग घेतला. लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये झालेल्या पाणथळ संवाद कार्यक्रमामध्ये डॉ. सुरवसे यांच्या हस्ते मान्यवरांचे रोप देऊन स्वागत केले. वडाच्या रोपाला जलदान करून कार्यक्रमाचे उद्‍घाटन झाले. भाग्यविधाता वारंग यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी क. म. शि. प्र. मंडळाचे सहचिटणीस महेंद्र गवस, लक्ष्मीनारायण देवस्थानचे सदस्य गुरू देसाई, आकार फाउंडेशनचे गजानन कांदळगावकर आदींनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: भारताच्या पहिल्या सामन्यासाठी संजू सॅमसनला संधी, तर इशान किशन, कुलदीप यादव प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर

Lonavala: दुर्गा श्वानामुळे सापडला ४०० फूट खोल दरीतला मृतदेह; ड्रोन तंत्रज्ञानाचीही झाली मोठी मदत

Paschim Maharashtra Temple Recruitment 2026: पश्चिम महाराष्ट्रातील मंदिरांसाठी लवकरच भरली जाणार नवी पदे; बक्कळ पगार अन् मिळणार ही सुविधा

Latest Marathi News Live Update : पुण्यातील विमाननगर परिसरात जोरदार राडा

कोण्या दिग्गज व्यक्तीने नाही तर 'या' माणसाने दादा कोंडकेंना दाखवली पांडू हवालदार सिनेमातील मोठी चूक

SCROLL FOR NEXT