swt313.jpg
21831
सावंतवाडी ः सर्वोदयनगर परिसरात नागरी वस्तीत शिरलेला गव्यांचा कळप.
सावंतवाडीत सर्वोदयनगर
परिसरात गव्यांचा कळप
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३ ः शहरातील सर्वोदयनगर परिसरात आज पहाटेच्या सुमारास गवारेड्यांचा मोठा कळप शिरल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. भरवस्तीत वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वनविभागाने याची त्वरित दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.
सर्वोदयनगर परिसरात आज पहाटे गव्यांचा कळप दिसून आला. यापूर्वी केवळ जंगल परिसरात आढळणारे गवे आता थेट नागरी वस्तीमध्ये येऊ लागल्याने चिंतेचे वातावरण आहे. विशेषतः मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या जीवाला यामुळे धोका निर्माण झाला आहे. एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल करत स्थानिक रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. वनविभागाने या परिसरात तातडीने उपाययोजना कराव्यात आणि गव्यांचा बंदोबस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी ठाम मागणी सर्वोदयनगरवासीयांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.