मतदानासाठी शनिवारी
आठवडा बाजार बंद
ओरोस ः जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२६ च्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया सुरळीतपणे होण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने शनिवारी (ता. ७) जिल्ह्यातील देवगड, कणकवली, मालवण, सावंतवाडी, दोडामार्ग या तालुक्यांतील आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील ज्या-ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरविण्यात येतो, त्या-त्या ठिकाणी मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, मतदान सुरळीतपणे पार पाडावे, यासाठी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने मतदानाच्या दिवशी भरविण्यात येणारा आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. यात देवगड तालुक्यातील मिठबाव, कणकवली-खारेपाटण, मालवण-सुकळवाड, माळगाव, सावंतवाडी-आरोंदा, कलंबिस्त, दोडामार्ग-साटेली भेडशी येथील आठवडा बाजार बंद ठेवण्यात येणार आहेत. या दिवशी भरविण्यात येणारे आठवडा बाजार अन्य दिवशी भरविण्यास अनुमती दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.