कोकण

देवरूखात १४ पासून बॅडमिंटन मानांकन स्पर्धा

CD

मुंबईत १७ मार्चला
पेन्शन अदालत
रत्नागिरी ः मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबईद्वारे टपाल विभागाच्या निवृत्ती वेतनधारकांसाठी/कुटुंब निवृत्त वेतनधारकांसाठी पेन्शन अदालत १७ मार्चला सकाळी ११.३० वा. मुंबई येथील मुख्य पोस्टमास्तर जनरल येथे आयोजित केली आहे. निवृत्ती वेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत/ज्यांचा सेवेत असताना मृत्यू झाला आहे. टपाल विभाग, महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे निवृत्ती वेतनधारक ज्यांचे ३ महिन्यांच्या आत पूर्तता झालेली नाही, अशा प्रकरणांचा डाक पेन्शन अदालतमध्ये विचार केला जाईल. पेन्शनधारकांनी तक्रार वैयक्तिकरित्या तीन प्रतीमध्ये वरिष्ठ लेखाधिकारी/सचिव, पेन्शन अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, मुंबई जीपीओ इमारत, १ला मजला, मुंबई ४००००१ येथे पाठवावी किंवा ई-मेलद्वारे accts.mh@indiapost.gov.in या पत्त्यावर १६ फेब्रुवारी किंवा त्यापूर्वी सादर करावी.
------
गटई कामगारांना
आता हक्काचा स्टॉल
रत्नागिरी : अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाने ''गटई स्टॉल योजने''च्या व्याप्तीत मोठी वाढ केली आहे. २८ जानेवारीच्या नवीन निर्णयानुसार, आता ग्रामीण भागासाठी ८० हजार आणि शहरी भागासाठी १ लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादा करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना १०० टक्के अनुदानावर ४७ हजार ५०० रुपये किमतीचे पत्र्याचे स्टॉल दिले जातील. ही योजना आता ''लिडकॉम''ऐवजी समाजकल्याण आयुक्तालयामार्फत राबवली जाणार आहे. यामध्ये विधवा, परित्यक्ता, दिव्यांग आणि ॲट्रॉसिटी पीडितांना प्राधान्य मिळेल. अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे आणि जागेची उपलब्धता ही लाभार्थ्यांची जबाबदारी असेल. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी कुवारबाव येथील सहायक आयुक्त, समाजकल्याण विभागाशी संपर्क साधावा.
-------
साखरपा आरोग्यकेंद्रात
हवा एमबीबीएस डॉक्टर
संगमेश्वर ः तालुक्यातील कोंडगाव येथील साखरपा प्राथमिक आरोग्यकेंद्रात एमबीबीएस डॉक्टरची सक्त गरज असून, ती प्रशासन व आरोग्य विभागाने पूर्ण करण्याची गरज आहे. या आधी असलेले डॉक्टर पुढील शिक्षणासाठी गेल्याने ही जागा रिक्त आहे. रत्नागिरी-नागपूर महामार्गालगत असणाऱ्या प्राथमिक आरोग्यकेंद्रावर सुमारे छत्तीस गावे अवलंबून आहेत. त्याचप्रमाणे आंबाघाट सुद्धा याच परिक्षेत्रात येत असल्याने अपघात होत असतात. अशावेळी एमबीबीएस डॉक्टर असतील तर रुग्णांना अधिक फायदा होईल व रुग्णांना रत्नागिरीला पाठवण्याचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे आरोग्यविभाग व प्रशासनाने याची दखल घेऊन साखरपा प्राथमिक आरोग्यकेंद्रात एमबीबीएस डॉक्टरची नेमणूक करावी, अशी मागणी होत आहे.
-----
देवरूखात १४ पासून
बॅडमिंटन मानांकन स्पर्धा
संगमेश्वर : बॅडमिंटन असोसिएशन ऑफ संगमेश्वर तालुका (बास्ट) यांच्यावतीने आणि जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेने ''स्व. बाळासाहेब पित्रे स्मृती सहावी जिल्हा मानांकन स्पर्धा'' आयोजित करण्यात आली आहे. १४ व १५ फेब्रुवारीला देवरूख येथील सुलभाताई आपटे क्रीडा संकुलात हा थरार रंगणार आहे. स्पर्धेत ११ ते १९ वर्षांखालील वयोगटासह खुला गट आणि ३५, ४० व ५० वर्षांवरील गटांतून सामने खेळवले जातील. जिल्हाभरातील मानांकित खेळाडू यात सहभागी होणार असून, विजेत्यांना आकर्षक चषक व रोख बक्षिसे देऊन गौरवण्यात येईल, अशी माहिती सचिव नीलेश भुरवणे यांनी दिली.
--------
जवाहर नवोदय विद्यालयात
शनिवारी प्रवेश परीक्षा
रत्नागिरी : नववी व अकरावीमधील रिक्त जागांच्या प्रवेशासाठी नवोदय विद्यालय परीक्षा ७ फेब्रुवारीला पडवे येथील नवोदय विद्यालयात होणार आहे. सकाळी ११ ते दुपारी १.४५ वाजेपर्यंत परीक्षा होईल. त्याकरिता विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र डाउनलोड करून घेउन परीक्षाकेंद्रावर सकाळी १०.३० वा. हजर राहावे, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालय प्राचार्य एस. बसवराज यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Road Accidents Reduction : २०३० पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी होणार? ; राज्यसभेत गडकरींनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

Pune Mumbai Expressway Traffic : द्रुतगती मार्गावरील अपघाताचा फटका; पुणे-बंगळूर महामार्गावर अवजड वाहतूक ठप्प

T20 World Cup: इशान किशनच ओपनर! सूर्याचा विश्वास पठ्ठ्याने सार्थ ठरवला, 7 Six अन् फिफ्टी; संजूचे स्थान धोक्यात

Pune Crime : मैत्रिणीला फोन केल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला

Jan Arogya Yojana : राज्‍यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्‍य केंद्रातही महात्‍मा फुले योजना; आता बाह्यरुग्ण विभागातील उपचारही मिळतील मोफत

SCROLL FOR NEXT